Bajrang Punia : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan singh) यांच्या जवळच्याच व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने देशातील कुस्तीपटूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी केल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात पुनियाने एक्सद्वारे पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.
मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है। 🙏🏽 pic.twitter.com/PYfA9KhUg9
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 22, 2023
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्याविरोधात कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर अनेक दिवस आंदोलन केले. त्याचे पडसाद संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून केली जात नसल्याचे दिसून येत होते.
मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकही कळत नाही; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र
अखेर कुस्तीपटू न्यायालयात गेल्याने पोलिसांना खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करावे लागले होते. बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या विनेश फोगाटसह बजरंग पुनिया, संगीता फोगाट, सोनम मलिक आणि अंशू मलिक यांसारखे पहिलवान उपोषणाला बसले आहेत. कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनादरम्यान, देशातील अनेक विरोधी पक्षांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन, यावर्षीचं पद्मश्रीने सन्मानित
दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व इतर पदासाठी निवडणूक झाली. त्यात संजय सिंह यांना चाळीस मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रकुल पदक विजेत्या अनिता श्योराण यांना केवळ सात मते मिळाली. तर इतर पदावरही बृजभूषण सिंह गटाने वर्चस्व मिळविले. संजय सिंह हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत आहेत. तर बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.
या निवडीनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत साक्षी मलिक म्हणाली, आम्ही चाळीस दिवस रस्त्यावर आंदोलन केले आहे. देशातील लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला होता. परंतु बृजभूषण शरण सिंह यांच्या व्यावसायिक भागीदार आणि निकटवर्तीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष निवडला जात आहे. त्यामुळे मी कुस्ती सोडत आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचेही मी आभार मानते, असं मलिकने जाहीर केलं आहे. त्यानंतर लगेचच बजरंग पुनियानेही आपल्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामुळे आता कुस्ती महासंघाच्या निवडीवरुन देशात कुस्तीप्रेमींमध्येही नाराजी व्यक्त केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.