बृजभूषण सिंह यांना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती
National Wrestling Federation : वादग्रस्त राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला गुवाहाटी उच्च न्यायालयाने (Guwahati High Court)स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh)यांना मोठा धक्का बसला आहे. ही निवडणूक 11 जुलै रोजी होणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही निवडणूक आता स्थगित झाली आहे. (national-wrestling-federation-election-brijbhushan-singh-guwahati-high-court-decision)
के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रावर लक्ष पण काँग्रेसने होम ग्राऊंडमध्येच पाडले खिंडार
आसाम कुस्ती महासंघाने राष्ट्रीय कुस्ती महासंघ, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) तदर्थ समिती आणि क्रीडा मंत्रालयाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने 11 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
Gauhati High Court puts a stay order on the Wrestling Federation of India election which was scheduled on 11th July.
— ANI (@ANI) June 25, 2023
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. त्याविरोधात कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर अनेक दिवस आंदोलन केले. त्याचे पडसाद संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून केली जात नसल्याचे दिसून येत होते.
अखेर कुस्तीपटू न्यायालयात गेल्याने पोलिसांना खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करावे लागले. त्यातच आता या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बृजभूषण सिंह यांना मोठा झटका बसला आहे. 11 जुलै रोजी होणारी निवडणूक स्थिगित करण्यात आली आहे.