के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रावर लक्ष पण काँग्रेसने होम ग्राऊंडमध्येच पाडले खिंडार

के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रावर लक्ष पण काँग्रेसने होम ग्राऊंडमध्येच पाडले खिंडार

BRS Vs Congress: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराला जोर लावला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. पण आता बीआरएसला होम ग्राऊंड म्हणजे तेलंगणामध्ये मोठा धक्का बसला आहे. केसीआर यांच्या पक्षातील सुमारे दीड डझन नेते सोमवारी (26 जून) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बीआरएस मधील बंडखोर जुपल्ली कृष्ण राव आणि माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी भेटण्याची शक्यता आहे.

खम्ममचे माजी खासदार पीएस रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव, आमदार दामोदर रेड्डी आणि तीन-चार माजी आमदारांसह सुमारे दीड डझन नेते दिल्लीत काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात या नेत्यांचे स्वागत करणार आहेत. कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला ज्या प्रकारे खिंडार पाडले आहे, त्यामुळे ही लढत रंजक बनली आहे.

पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल

बीआरएसच्या बंडखोर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाने अविभाजित खम्मम आणि महबूबनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनाही बोलावले आहे. या बैठकीत बीआरएस आणि भाजपमधील आणखी नेते सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube