What will expensive and Cheaper in India after Tariffs : अमेरिकेच्या (America) डोनाल्ड ट्रम्प सरकारने आज मध्यरात्री 2 वाजता लिबरेशन डे ची घोषणा करत जगभरातील देशांवर टॅरिफ (Donald Trump‘s tariffs) आकारण्याची घोषणा केलीय. यात भारतावर 26 टक्के तर चीनवर 34 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर भारतात (India) कोणत्या गोष्टी महागणार आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, ते सविस्तरपणे पाहू या.
अमेरिकन वस्तूंवर सर्वाधिक टॅरिफ लावणाऱ्या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. भारतात आयातींवर सरासरी 17 टक्के टॅरिफ आकारला जातो. ट्रम्पच्या टॅरिफमुळे भारतातील घरगुती बाजाराची मागणी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. अमेरिकेनं औषधांना टॅरिफच्या चौकटीतून बाहेर ठेवलंय, ही एक दिलासादायक बाब आहे.
कामाची बातमी! राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’; घरात बसून करता येणार रजिस्ट्री
सिटी रिसर्चच्या अंदाजानुसार, टॅरिफ लागू झाल्यामुळे आता भारताला दरवर्षी 700 कोटी डॉलरचं नुकसान सोसावं लागू शकते. भारतातून अमेरिकेमध्ये 11.8 अब्ज डॉलर किमतीचं सोनं, चांदी आणि हिरे निर्यात होतात. टॅरिफमुळे ही निर्यात कमी झाल्यास याचा परिणाम छोटे व्यापारी आणि कारागीर यांच्यावर पडू शकतो. भारतातील पुरवठा वाढल्यामुळे दागिन्यांच्या किमती कमी देखील होऊ शकतात.
भारतातून अमेरिकेत 14.39 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाईल, टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्यात होतात. टॅरिफमुळे आयफोन आणि इतर मोबाईलची उपकरणं महाग होऊ शकतात. यासोबतच कपडे आणि चपला व्यापाराला देखील टॅरिफमुळे चांगलाच फटका बसु शकतो. भारत तांदूळ, कोळंबी, मध, वनस्पती अर्क, एरंडेल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो. तर अमेरिका बदाम, अक्रोड, पिस्ते, सफरचंद आणि डाळी पाठवतो.
‘मातोश्री’वर ठाकरेंसमोर गटबाजी उफाळली, निवडणुकीचा अजेंडा पण… अंतर्गत वादाची हायव्होल्टेज चर्चा
भारत अमेरिकेमध्ये 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो. टॅरिफमुळे याची निर्यात कमी झाल्यास भारतात ते स्वस्त दरात उपलब्ध होईल. मात्र हा व्यवसाय करणाऱ्या लोकाच्या आर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम होईल. अमेरिकेत भारतीय मिठाई आणि खाद्यपदार्थ महाग झाल्यास निर्यात कमी झाली, तर भारतीय कंपन्यांना नुकसान सोसावं लागेल. दुग्धजन्य उत्पादनांवरच्या टॅरिफमुळं अमेरिकेमध्ये तूप, बटर आणि दूध पावडर महाग होईल. भारतात हीच उत्पादनं स्वस्त दरात उपलब्ध होतील. परंतु याचा परिणाम हे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर होईल.