Rajesh Mehta : LIC चे कार्यालय कुठे आहे? मला माहिती नाही; सेबी प्रकरणात राजेश महेताची प्रतिक्रिया

Rajesh Mehta :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणारे राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी मला एलआयसीचे ऑफिस कुठे

Rajesh Mehta

Rajesh Mehta

Rajesh Mehta :  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणारे राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी मला एलआयसीचे ऑफिस कुठे हे देखील माहिती नसल्याची माहिती चौकशी दरम्यान दिली आहे. तपासा दरम्यान त्यांनी स्वत:ला एलआयसीने घेतलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयांपासून दूर ठेवले आहे. परिस्थिती काहीही असली तरी, सामान्य किरकोळ शेअर्सहोल्डरला याचा फायदाच होईल असं त्यांनी चौकशी दरम्यान सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे.
एलआयसीने (LIC) शेअर्स काल किंवा गेल्या वर्षी खरेदी केलेले नाहीत. एलआयसीने ही गुंतवणूक जवळपास 20 वर्षांच्या कालावधीत केली आहे. एलआयसीने हे शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले आहेत. एलआयसीचे कार्यालय कुठे आहे, हे आम्हाला माहिती नाही. आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क किंवा संबंध नाही. दुय्यम बाजारातून शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय हा त्यांच्या स्वत:च्या निर्णयावर आधारित एक व्यावसायिक निर्णय होता असं राजेश मेहता म्हणाले.
राजेश एक्सपोर्ट्समधील LIC चा हिस्सा किती ? 
माहितीनुसार, राजेश एक्सपोर्ट्समध्ये एलआयसीचा हिस्सा 10.80 टक्के आहे. हे शेअर्स खरेदी करण्यामध्ये स्वत:त्यांची किंवा इतर प्रवर्तकांची कोणतीही भूमिका नव्हती. कोणत्याही प्रवर्तकाने त्यांचे शेअर्स एलआयसीला कधीही विकलेले नाहीत. कंपनीने एलआयसीला कधीही कोणतेही शेअर्स जारी केलेले नाहीत. एलआयसीने शेअर्स खरेदी केल्यामुळे कंपनीला किंवा प्रवर्तकांना कोणत्याही प्रकारे फायदा झालेला नाही.
LIC च्या गुंतवणुकीच्या निर्णयांशी कोणताही संबंध नाही 
मेहता (Rajesh Mehta) यांनी सांगितले की, कंपनीचा एलआयसीच्या गुंतवणुकीच्या निर्णयांशी कोणताही संबंध नाही आणि त्याबाबत कोणतीही माहितीही नाही. एलआयसीचे कार्यालय कुठे आहे, हे आम्हाला माहितही नाही. आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क किंवा संबंध नाही. दुय्यम बाजारातून शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय हा त्यांच्या स्वतःच्या निर्णयावर आधारित एक व्यावसायिक निर्णय होता. राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण होऊनही, मेहता यांनी स्वतःच्या आकलनानुसार विश्वास व्यक्त केला की  एलआयसीला आतापर्यंत कोणताही तोटा झालेला नाही.
कंपनीच्या शेअर्समधील घसरण
3 जूनपासून राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये 14% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. सोमवारी, या शेअरने 94.50 चा नवीन नीचांक गाठला. ते म्हणाले, “मूल्यात झालेली ही घट असूनही, माझ्या माहितीनुसार, एलआयसीला अद्याप कोणताही तोटा झालेला नाही…”

फायदा कोणाला झाला? राजेश मेहता यांचा प्रश्न

मेहता म्हणाले, “समजा एलआयसीला तोटा झालाच, तरी त्या बदल्यात फायदा कोणाला झाला? एकाचे नुकसान झाले तर दुसऱ्याचा फायदा होतो. मग फायदा कोणाला झाला? तर तो सामान्य भारतीय जनतेला झाला आहे.
मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता; फडणवीस सरकारने घेतले 4 मोठे निर्णय 
एलआयसीने सामान्य भारतीय जनतेकडूनच हे शेअर्स घेतले होते आणि त्यामुळे जनतेचाच फायदा झाला. यात काय चूक आहे? जे लोक याच्या विरोधात बोलत आहेत, ते प्रत्यक्षात सामान्य भारतीय जनतेच्या हिताच्या विरोधातच बोलत आहेत का?
Exit mobile version