Who Is Aarthi Subramanian : आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेला देण्यात येणार आहे. आरती सुब्रमण्यम 1 मे पासून हे पद स्वीकारतील. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीत एका महिलेला इतके मोठे पद देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आरती सुब्रमण्यम यांनी 1989 मध्ये टीसीएसमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आता त्यांच्या कठोर परिश्रम आणि क्षमतेमुळे त्या सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी;राऊतांचा योजनांच्या खर्चावरून थेट घाव
भारतातील आयटी क्षेत्रात खूप कमी महिला उच्च पदावर पोहोचल्या आहेत. काही परदेशी आयटी कंपन्यांच्या भारतीय शाखांचे नेतृत्व महिलांकडं सोपवण्यात आलं असलं तरी, 30 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या टीसीएस कंपनीचे सीओओ होणं ही एका महिलेसाठी ऐतिहासिक बाब आहे.
टीसीएसचे सीईओ के. कृतिवासन म्हणाले की, आरतीला कंपनीच्या संरचनेची आणि तांत्रिक बाबींची सखोल समज आहे. त्यांनी टीसीएस आणि टाटा ग्रुप या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
टाटा ग्रुपमधील अनेक गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीरित्या हाताळल्यामुळे आरती सुब्रमण्यम यांना ‘मिस फिक्सिट’ म्हणून ओळखले जाते. आरती सध्या टाटा सन्समध्ये मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून काम करत आहे, जिथे त्या डिजिटल स्ट्रॅटेजी, इनोव्हेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर काम करत होत्या.