मुख्यमंत्री फडणवीसांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी…राऊतांचा योजनांच्या खर्चावरून थेट घाव

मुख्यमंत्री फडणवीसांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी…राऊतांचा योजनांच्या खर्चावरून थेट घाव

Sanjay Raut on Maharashtra Economic Situation : ज्या लाडक्या बहिणींकडून १५०० रूपयांच्य बदल्यात मते विकत घेतलीत त्याच मतांची किंमत आत ५०० वर आली आहे. उद्या ती आता शून्यावर येईल. (Raut) या राज्याची आर्थिक परस्थिती बिकट आहे, सरकारी कर्माचाऱ्यांते पगार द्यायला पैसे नाहीत असा थेट दावा शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना कराव्यात, आव आणावा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण गेल्या साडे तीन वर्षामध्ये राज्याची आर्थिक शिस्त बिघडली, आर्थिक अराजक अशा खाईमध्ये हे राज्य सापडलं आहे. अजित पवार बोलत नसले तरी त्यांना त्या चिंतने ग्रासल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

फुले चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर

अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, अजित पवार आपल्या फाइल मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यसारख्या लोकांना पडतो. तुमचे ५-२५ आमदार हे फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले. या राज्याची परवानगी तुम्हाला हवी आहे का? यावरचं अमित शहांनी काय उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. असा दावाही राऊतांनी केला आहे.

माझं नाव संजय राऊत आहे, हा संजय महाभारतातही होता. जो सर्व चित्र डोळ्यात कानात साठवायचा, आमच्याकडं लोकं आहेत ना, ते महत्त्वाचे लोक आहेत. ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. अमित शहांनी काढेलली समजूत काढली ती पत्रकार म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न करा. एक दिवस भाजपच्या गोटातूनच समजेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube