Video : पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन; व्हिडिओत दु:ख मांडलं अन् संदेशही दिला

Suicide Due To Wife Torture : आग्रा येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. (Suicide ) येथील मानव शर्मा (TCS कर्मचारी) यांनी 24 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमागील कारण वैवाहिक वाद असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मृत्यूपूर्वी सात मिनिटांचा भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यात आपले दु:ख व्यक्त केलं.
मला पश्चाताप होतोय चूक झालीय, सरेंडर करायचं स्वारगेटच्या नराधमाच्या अटकेचा सिनेस्टाईल थरार..
6 मिनिटे 56 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मानव शर्मा गळ्यात फास लावून बोलताना दिसतात. फासाचा एक टोक पंख्याला बांधलेला आहे. व्हिडिओत ते म्हणतात, ‘कायद्याने पुरुषांचेही रक्षण केले पाहिजे, नाहीतर अशी वेळ येईल की कुणीही पुरुष शिल्लक राहणार नाही, ज्याच्यावर आरोप करता येईल.” त्यांनी आपल्या पत्नीच्या बाहेरील संबंधांबद्दल माहिती असूनही शांत राहण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांनी हाताच्या जखमाही दाखवल्या आणि आधीही अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याच सांगितलं.
पोलीस तक्रारीला उशीर?
मानव यांच्या कुटुंबाने आग्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाशिवरात्रीच्या ड्युटीमुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला. यानंतर त्यांनी थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली, आणि अखेर गुरुवारी रात्री व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पत्नीने आरोप फेटाळले
मानव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने स्वतःवर होणारे आरोप फेटाळले आणि पतीच मानसिकरीत्या अस्थिर असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, मानव माझ्या भूतकाळाबद्दल ऐकूनच अस्वस्थ झाला होता. तो मद्यपान करायला लागला आणि सतत वाद घालू लागला. तीन वेळा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि “मीच त्याला वाचवले होते, असे पत्नीने सांगितले. मात्र, शेवटी त्याने मला माझ्या माहेरी सोडून दिले,” असे ती म्हणाली.
कांपती रूह के नारे दुःखद है
ऐसे परिणाम सारे दुःखद है
आँखों के आँसू सूखते नही है अब
जिंदगी के ऐसे किनारे दुःखद है©किशोर चौहान
दुखद है 😖😖
"सॉरी मम्मी-पापा, मैं पत्नी से तंग आ चुका हूं, प्लीज मर्दों के बारे में कोई तो बात करे"
यह आख़िरी शब्द हैं आगरा के मानव शर्मा के, मानव… pic.twitter.com/kuD0jgdVpA— शब्द साहित्य मंच (@shabdsahity) February 28, 2025