राहुल गांधींनी दावा केलेली, हरियाणात 10 बुथवर 22 वेळा मतदान करणारी ब्राझीलची मॉडेल कोण?

Rahul Gandhi यांनी ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात 10 बुथवर 22 वेळा मतदान केल्याचा दावा केला पण ही मॉडेल नेमकी कोण जाणून घेऊ सविस्तर...

Rahul Gandhi

Rahul Gandhi

Who is the Brazilian model claimed by Rahul Gandhi who voted 22 times in 10 booths in Haryana : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. “एच फाइल्स” या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी निवडणुकील हेराफेरीचे गंभीर आरोप केले.यामध्ये त्यांनी ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात 10 बुथवर 22 वेळा मतदान केला असा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण ही मॉडेल नेमकी कोण जाणून घेऊ सविस्तर…

हरियाणात मतदान करणारी ब्राझीलची मॉडेल कोण?

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एका तरुणीचा फोटो दाखवला आणि या फोटोसोबत 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे? या मॉडेलचं नाव मॅथ्य्यूज फरेरो असल्याचं कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. हे फोटो अनप्लॅश आणि पिक्सेल या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत. जे फोटो स्टॉक म्हणून वापरले जातात. या महिलेचे फोटो ब्लू डेनिम जॅकेटमध्ये आहेत.

पुणे पोलिसांच्या टार्गेटवर मारणे गँग! मारणे टोळीचा शार्प शूटर बनसोडेला मध्यरात्री घेतलं ताब्यात

मात्र हा फोटो जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो. तेव्हा मॅथ्य्यूज फरेरो नावाचा फोटोग्राफर आहे. ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये हा फोटो काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या फोटोवर कोणतही नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे अद्याप या मॉडेलबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही.

‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा; हृता दुर्गुळे-सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

यावर पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version