Who Will Bihar Next CM: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) एनडीएला (NDA) घवघवीत यश मिळाले आहे. भाजप (BJP) सर्वाधिक 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. तर 85 जागा जिंकून नितीशकुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू हा पक्ष लहान भाऊ ठरला आहे. पण लहान भावावर लोकसभेचे गणित अंवलबून आहे. त्यामुळे दोन दिवसही होऊन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत नाव जाहीर झालेले नाहीत. काही नावे चर्चेत आलेले आहेत. परंतु भाजपकडून मुख्यमंत्रीपदाबाबत सावध भूमिका घेतलीय. एनडीएचे आमदार नेता निवडतील, असं बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले आहे. (Who Will Bihar Next CM bjp obc Nitish Kumar)
बीडमध्ये भाजपचा अजित पवारांना धक्का! तरुण चेहरा योगेश क्षीरसागरांनी हाती घेतलं कमळ
…….तर नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री
विधानसभेचा निकाल जाहीर होऊन दोन दिवस झाले आहेत. परंतु मुख्यमंत्रीपदावर कोण बसविणार याबाबत अद्याप तरी चर्चा बाहेर आलेली नाही. जेडीयूने एक ट्वीट करत नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे म्हटलं होतं. पण काहीच वेळात हे ट्वीट हटविण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या जदयूचे लोकसभेत बारा खासदार आहे. मोदी यांच्या सरकारसारखी बारा खासदार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते नितीशकुमार यांना सहजासहजी दुखविणार नाहीत. नितीशकुमार यांचे सुशासन बाबू धोरणामुळे एनडीएला हे यश मिळाले आहे. परंतु आता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपला आपला मुख्यमंत्री विराजमान करायचा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याचनुसार बिहारचा मुख्यमंत्री निवडला जाऊ शकतो. परंतु बिहारचे राजकारण वेगळे आहे. तेथे नितीश कुमारांचा जास्त होल्ड आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमारांना बाजूला करण्याची रिस्क घेईल का हा मोठा प्रश्न आहे. जर नितीशकुमार हे मुख्यमंत्री झाले तर हा विक्रम असेल. कारण ते दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील.
तब्बल 99 वर्षांचं मोहिते पाटलांचं साम्राज्य संपवण्यासाठी भाजप मैदानात, काय आहे राजकीय गणित?
भाजपच्या या नेत्यांचे नावे चर्चेत, ओबीसी की भूमिहार
बिहारमध्ये जातीचे गणितही इतर राज्यांपेक्षा वेगळं आहे. जात फॅक्टरबघून मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. भाजपचा विजयकुमार सिन्हा हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत. ते भूमिहारचा चेहरा आहेत. ते विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तेही मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असणार आहेत. सम्राट चौधरी यांचे ही नाव चर्चेत आहे. तर एनडीएमध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. ते नितीश कुमार यांच्यासाठी एक मोठा पर्याय आहे. कारण नितीशकुमार हे ओबीसी असून, कुर्मी समाजातून येतात. सम्राट चौधरी हेही ओबीसी (कुर्मी) चेहरा आहे.
महिला मुख्यमंत्री देणार का ?
रेणुदेवी हा एक चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. दिल्लीत रेखा गुप्ता यांना भाजपने मुख्यमंत्रिपदी बसविले. त्याचप्रमाणे रेणुदेवीचे नाव चर्चेत येऊ शकते. रेणुदेवी बिहारचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. या निवडणुकीत एनडीएला महिला मतदारांनी भरघोस मते देत बहुमत मिळवून दिले आहे. त्या अति पिछडा वर्ग म्हणजेच ईबीसीचे प्रतिनिधीत्व करतात.
भाजप यादव कार्ड खेळणार ?
मुख्यमंत्रीपदासाठी राम कृपाल यादव यांचे नाव पुढे येत आहेत. ते दिग्गज राजकारणी आहेत. भाजपने मध्य प्रदेशमध्ये यादव मुख्यमंत्री बसविला आहे. त्यामुळे भाजप यादव मुख्यमंत्रीपदावर बसू शकतात.
