Narendra Modi : देशात लोकसभा निवडणुकीचे (LokSabha Election) वारे जोरात वाहू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) लोकप्रियतेसमोर विरोधी पक्षातील नेत्यांच्या कोलांटउड्या सुरु झाल्यात. नरेंद्र मोदींची लोकप्रियता भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड आहे. नरेंद्र मोदींनी अद्याप निवृत्तीचा कोणताही विचार केला नसला तरी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नेहमी चर्चा होत असते. आता एका सर्व्हेक्षणात त्यांचा योग्य उत्तराधिकारी कोण असेल? योगी आदित्यनाथ, अमित शाह की… आणखी कोण? हे मूड ऑफ नेशनमधून काय समोर आलंय…
मोदी 3.0 चा कार्यकाळ
2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मैदानात उतणार आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द नरेंद्र मोदी यांनीही आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा अनेक वेळा दावा केलाय. राज्यसभेत त्यांनी आपल्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. काही लोक याला ‘मोदी 3.0’ म्हणतात, असे त्यांनी म्हटले होते.
नेहरु, गांधी परिवाराला लोकप्रियता लाभली
2014 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा भाजपला झालाय. आज त्यांच्या तोडीचा नेता राजकारणात नाही, असे मानले जाते. एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनाही अशीच लोकप्रियता होती. त्यांच्यासमोर कोणत्याही विरोधी पक्षातील नेत्यांचा निभाव लागत नव्हता. आता नरेंद्र मोदी त्याच मार्गावर आहेत. 2014 आणि 2019 ला मोदींच्या लोकप्रियतेसमोर विरोधाकांची धुळधाण उडाली होती. 2024 ला देखील नरेंद्र मोदींची लोकप्रियता टिकून आहे. पण मोदींनंतर भाजपमध्ये कोण हे मूड ऑफ नेशनमधून समोर आलंय..
“अशोकराव बिनशर्त भाजपात, त्यांची मदत कुठे घ्यायची मला चांगलं माहित”; फडणवीसांचा क्लिअर मेसेज
मोदींचा उत्तराधिकारी कोण?
2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक लढविली नाही, तर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? हे मूड ऑफ नेशनच्या सर्वेतून समोर आलंय… पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जात आहे. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजपामध्ये उत्तराधिकारी कोण असा सवाल विचारण्यात आला होता. यावर लोकांनी अमित शहा आणि आदित्यनाथ यांच्यात कडवी टक्कर असल्याचे सांगितले. भाजपातील चेहरा कोण असेल यावर, सर्व्हेमध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांनी अमित शहा यांना 29 टक्के, योगी आदित्यनाथ यांना 25 टक्के, नितीन गडकरींना 16 टक्के पसंती दिली आहे.
“मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार… 50 वर्षांची सवय अन् अशोक चव्हाणांचं पोटातलं ओठावर
एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका
महत्वाचे म्हणजे, 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून पर्यंत आहे. यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका लागू शकतात. यासंदर्भात निवडणूक आयोग लवकरच घोषणा करेल. अशात भाजप विजयाच्या हॅट्रिकचा दावा करत आहे, चार शे प्लस जागांचे लक्ष निर्धारित करून भाजप मैदानात उतरला आहे.
“PM मोदींचे काम पाहून इम्प्रेस झालो…” : भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांची स्तुतीसुमने