ए गिरीषभाऊ इकडे कार्यक्रम; चव्हाणांच्या प्रवेशावेळी भरकटलेल्या महाजनांना फडणवीसांचं मार्गदर्शन

  • Written By: Published:
ए गिरीषभाऊ इकडे कार्यक्रम; चव्हाणांच्या प्रवेशावेळी भरकटलेल्या महाजनांना फडणवीसांचं मार्गदर्शन

मुंबई : काँग्रेसचा हात सोडत अखेर ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) बावनकुळे, शेलार आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चव्हाणांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या गर्दीत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) कार्यक्रमस्थळाचा रस्ता भरकटले पण फडणवीसांनी वेळीच मार्गदर्शन करत त्यांना योग्य मार्गाची आठवण करून दिली. (Girish Mahajan Forget Ashok Chavan Function Hall)

दॅट चॅप्टर इज ओव्हर; राहुल गांधी अन् वरिष्ठांचे नाव घेताच अशोक चव्हाणांची बोलकी प्रतिक्रिया

त्याचे झाले असे की, काल (दि.12) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाच्या सदसत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अमित शाहंच्या छ. संभाजीनगर दौऱ्यावेळी ते जाहीर प्रवेश करतील असा अंदाज होता. परंतु, पडद्यामागे घडलेल्या घडामोडींनंतर घाईगडबडीत का होईना फडणवीस आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत चव्हांनी कमळ हातात घेतले आहे.

“अशोकराव बिनशर्त भाजपात, काँग्रेसने आतातरी आत्मचिंतन करावं”; फडणवीसांचा काँग्रेसला खोचक टोला

सकाळपासूनच चव्हाणांच्या भाजप प्रवेशासाठी मुंबईतील भाजप कार्यालयात लगबग सुरू होती. त्यानंतर भाजप कार्यालयात चव्हांणांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. चव्हाणांच्या स्वागतावेळी प्रविण दरेकर आणि महाजन त्यांच्यासोबत होते. यानंतर पाठोपाठ बानवकुळे, फडणवीस आणि शेलारांची पक्ष कार्यालयात एन्ट्री झाली.

Letsupp Special : ‘म्हणून’ भाजपचे नेते डोळा मारत होते… अन् अशोक चव्हाणही प्रेमात पडत होते!

या सर्व गर्दीत ज्यावेळी सर्व नेते कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी पत्रकारांनी पक्ष प्रवेश होत आहे काय सांगाल असे विचारले. मात्र, या प्रश्नाला बगल देत फडवीसांनी मात्र, रस्ता भरकटलेल्या महाजनांना क्षणाचाही विलंब न करता ए गिरीशभाऊ इकडे आहे कार्यक्रम असे सांगत योग्य मार्ग दाखवला.

चांगले बदलच दिसत नव्हते, किती कोंडी होऊ द्यायची? अशोक चव्हाणांचा खरा राग नाना पटोलेंवरच!

चव्हाणांना कोणतीही अपेक्षा नाही – फडणवीस 

चव्हाणांच्या प्रवेशावेळी फडणवीसांनी त्यांच्या शैलीत काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नसून काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली हे कळत नाहीये. कोणत्याही पदाची अपेक्षा ने करता चव्हाण भाजपमध्ये आल्याचेही फडणवीस म्हणाले. तसेच आणखी काही नेते आमच्यासोबत चर्चेत असल्याचे सूचक विधान फडणवीसांनी यावेळी केले. त्यामुळे चव्हाणांनंतर आता कोणते नेते काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube