Download App

‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा स्थगित, राहुल गांधी तातडीने वायनाडला रवाना

Bharat Jodo Nyay Yatra : उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा (Bharat Jodo Nyay Yatra) शनिवार (१७ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. वाराणसीनंतर राहुल गांधी भदोहीला जाणार होते, मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते अचानक वायनाडला गेले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.

भारत जोडो न्याय यात्रेच्या 35व्या दिवशी राहुल गांधी शनिवारी वाराणसीला पोहोचले. राहुल गांधी वाराणसीनंतर भदोहीला जाणार होते, परंतु काही तातडीच्या कारणांमुळे त्यांनी यात्रा अर्धवट सोडून वायनाडला आपल्या मतदारसंघात गेले आहेत.

काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधी यांना वायनाडमध्ये तातडीने पोहचणे आवश्यक आहे. भारत जोडो न्याय यात्रा रविवारी (18 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता प्रयागराजमधून पुन्हा सुरू होईल.

Navjyot Singh Sidhhu : लोकसभेपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका, तीन आमदारांसह सिद्धू भाजपमध्ये जाणार?

दरम्यान, मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी एलडीएफ, विरोधी यूडीएफ आणि भाजपने संप पुकारला होता. तो संप आता पुलपल्लीमध्ये उफाळून आला आहे.

‘श्रीमंत आणि गरीब असे दोन भारत’
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी गोदौलिया चौकात लोकांना संबोधित करताना म्हटले की, हा देश द्वेषाचा नाही तर प्रेमाचा देश आहे. अतंर्गत वादामुळे देश कमकुवत होईल, देश एकजूट करणे हीच खरी देशभक्ती असल्याचे ते म्हणाले.

इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या

ते म्हणाले, मी गंगेसमोर अहंकारने आलो नाही, मी माझे मस्तक झुकवून आलो आहे. या प्रवासात आपण आपल्या भावांना भेटायला आलो आहोत असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. देशात दोन भारत आहेत, एक श्रीमंत आणि एक गरीब.

रायबरेलीत अखिलेश यादव सहभागी होणार
तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे रायबरेलीतून यात्रेत सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातून राजस्थानच्या दिशेने जाईल. मणिपूर ते मुंबई पूर्वेकडून पश्चिमेकडे हा प्रवास 6,000 किलोमीटरहून अधिक लांबीचा असून तो 14 राज्यांमधून जाणार आहे.

follow us