Download App

अतिक-अश्रफला गोळ्या घातल्यानंतर मारेकऱ्यांनी का दिला ‘जय श्री राम’चा नारा?

Atiq-Ashraf Murder Case : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची हत्या झाल्यापासून उत्तर प्रदेशातील (UP)प्रयागराज (Prayagraj)जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. माफियांना गोळ्या घालून तीन आरोपींनी जय श्री रामचा (Jai Shri Ram)नारा का लावला, असा सवालही सर्व विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे. आता याचे उत्तरही उत्तर प्रदेश पोलिसांना (UP Police)मिळाले आहे. शूटर सनीने (Shooter Sunny)स्वतःच यामागचे सत्य उघड केले आहे.

खासदारकी वाचवण्यासाठी राहुल गांधी हायकोर्टात जाणार, सुरत न्यायालयाने याचिका फेटाळली

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांना गोळ्या घातल्या, तेव्हा रुग्णालयाबाहेर मीडिया कर्मचार्‍यांचा जमाव जमला होता. या सर्व प्रकारात तिघेही आरोपी लपून बसले आणि त्यांनी लगेच बाहेर येऊन अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार केला.

शूटर सनीने सांगितले की, तिघेही मरायला आले नाहीत, म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले आणि गोळीबार केल्यानंतर ते खूप घाबरले, म्हणून त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. हत्येतील तिन्ही आरोपींचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी त्यांची 8 तास मानसिक चौकशी केली.

यादरम्यान त्यांच्याकडून अनेक गुपितं उघड झाली. चौकशीदरम्यान लवलेश तिवारीने स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी असल्याचे सांगितले. पोलीस रुग्णालयाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. तिघेही ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही घेण्यात येणार आहे.

अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर आरोपींनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याबद्दल विरोधी पक्षांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही याबाबत वक्तव्य केले होते.

हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले होते की, जय श्री रामचा जयघोष करून कोणालाही ठार मारणे योग्य नाही, भले तो गुन्हेगार असला तरी. आपला देश कायदा आणि सुव्यवस्थेवर चालतो, जंगलराजवर नाही, अशी टिकाही केली जात आहे.

Tags

follow us