सत्तासंघर्षावर आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार..

सत्तासंघर्षावर आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार..

Prakash Ambedkar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातून आता कधीही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘न्यायालयाचा निकाल येईल. पण, न्यायालयाला कुणालाही अपात्र ठरवता येणार नाही. न्यायालयाला तसा अधिकार सुद्धा नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाद्वारे कुणी अपात्र होईल असे वाटत नाही’, असा दावा आंबेडकर यांनी केला.

‘या निर्णयाच्या माध्यमातून राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जातील असे मला वाटते. परंतु, राज्यपालांनी घेतलेला निर्णय फिरवला जाऊ शकणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.

आमदार जगतापांची सडेतोड मुलाखत

प्रकाश आंबेडकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ‘राज्यपालांनी घेतलेला निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य यावर न्यायालय भाष्य करू शकत नाही. या निर्णयाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जातील मात्र त्यांचा निर्णयच फिरवला जाईल याची शक्यता कमीच आहे. याचे कारण म्हणजे ती घटना घडून गेली आहे. राज्यपालांनी त्यावेळी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली. मतदानासाठी सभागृह बोलावण्यात आले होते. पण, त्याआधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आदेशाची अंमलबजावणी झाली. आता राज्यपालांचे ते आदेश कोर्ट मागे घेईल’, असे वाटत नाही.

त्यांनी साधे पाणी आणि छतही दिले नाही 

खारघर येथे झालेल्या दुर्घटनेवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘दुर्दैव आहे. महाराष्ट्र शासन असेल किंवा ज्यांचा सत्कार करण्यात आला, ते धर्माधिकारी दोघांनीही चमडी बचाव अशा रीतीने तो कार्यक्रम केला. साधासुधा कार्यकर्ता ज्यावेळेस कार्यक्रम करतो आणि ज्या वेळेस दुपारचा कार्यक्रम करतो. त्यावेळी तो वर तरी छप्पर बांधतो आणि पाण्याची सोय करतो.’

Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र

‘धर्माधिकारी यांचा असणारा ट्रस्ट आपण बघितला तर चार जणांचा आहे. कुटुंबाचे प्रश्न आहे. त्यांची संपत्ती किती आहे हे त्यांनी जाहीर केलेलं नाही पण मी निश्चितपणे एवढं मानतो की त्या ट्रस्टकडे एवढी संपत्ती आहे की ते वरती छत बांधू शकतात. त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं पाण्याची सोय नाही त्यावेळेस शासन आणि धर्माधिकारी यांचे ट्रस्ट हे पाणी सहज त्या ठिकाणी उपलब्ध करू शकत होते पण तसे करण्याची मानसिकता पाहिजे.’

‘मी फक्त धर्माधिकारी यांच्या भक्तांना एवढेच म्हणणार आहे तुम्ही आता विचार करा ज्या ट्रस्टला आणि ज्या व्यक्तीला तुम्ही लाखो रुपयांचे डोनेशन दिलेले आहे आणि त्यांचा सत्कार होत असताना ते जर तुमच्या डोक्यावर छप्पर देत नसतील तर काय परिस्थिती आहे तर याचा विचार केलेला आपण बरा.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube