Indigo Airline : 434 विमाने, 10,000 क्रू पण तरीही सेवा रद्द; अचानक इंडिगो संकटात का?

Indigo Airline : देशाची सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत आहे. सध्या कंपनीला गंभीर संकटाचा सामना करावा लागत

Indigo Airline

Indigo Airline

Indigo Airline : देशाची सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत आहे. सध्या कंपनीला गंभीर संकटाचा सामना करावा लागत असल्याने त्याचा थेट परिणाम प्रवाशांवर होताना दिसत आहे. या संकटामुळे कंपनीला वारंवार उड्डाणे रद्द करणे किंवा उड्डाणांमध्ये विलंब करावा लागत आहे. कंपनीला गेल्या आठ दिवसात देशातील आठ विमानतळांवर 100 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागले आहे. यामुळे हजारो प्रवासी अडकले आहेत.

इंडिगोवर (Indigo Airline) आलेल्या संकटामुळे देशातील काही प्रमुख मर्गांवरील तिकिटांच्या किमती अचानक वाढल्या आहेत ज्यामुळे नागरिकांच्या खिशाला भार पडत आहे. इंडिगोकडे 434 विमाने असून 2,300 हून अधिक दररोज उड्डाणे होतात. देशांतर्गत उड्डाणांपैकी 60 टक्क्यांहून अधिक उड्डाणे इंडिगोकडे आहेत. सध्या, विमान कंपनी 5,456 पायलट, 10,212 केबिन क्रू आणि एकूण 41,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत मात्र तरीही देखील कंपनीला क्रूच्या कमतरतेशी अडचण निर्माण झाली आहे.

इंडिगोच्या विमानांना होणाऱ्या विलंब आणि रद्द होण्याची अनेक कारणे (Indigo Airline Crisis) समोर येत आहेत. काही तांत्रिक बिघाडाचे कारण देत आहेत, तर काही क्रू मेंबर्सच्या कमतरतेचे कारण देत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, प्रवाशांना विलंबाचे स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही. एअरलाइन पायलट्स असोसिएशनने आरोप केला आहे की इंडिगोची खरी समस्या म्हणजे वैमानिकांची तीव्र कमतरता आहे. कंपनी हे लपवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे विलंब आणि रद्दीकरण होत आहे.

असोसिएशनचा असाही आरोप आहे की, वैमानिकांची कमतरता लपवण्याव्यतिरिक्त, इंडिगो वारंवार होणाऱ्या विलंब आणि रद्दीकरणांचा वापर उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादेतून सवलत मिळविण्यासाठी करत आहे. असे मानले जाते की कंपनी या परिस्थितीचा उल्लेख करून सरकारकडून एफडीटीएल नियमांमध्ये शिथिलता मिळवत आहे. त्यामुळे हा मुद्दा केवळ वैमानिकांच्या कमतरतेचा नाही तर नवीन नियम बदलण्याचा दबाव असल्याचे दिसून येते.

आज ही उड्डाणे रद्द

देशभरातील इंडिगोच्या विमानांना होणारा अडथळा प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक दिसून आला. बेंगळुरूमध्ये आज 42 उड्डाणे रद्द झाली आहे. तर दिल्लीत 38 उड्डाणे झाली. अहमदाबादमध्ये 25, हैदराबादमध्ये 19, इंदूरमध्ये 11 आणि कोलकातामध्ये 10 उड्डाणे झाली. सुरतमध्येही आठ उड्डाणे रद्द करण्यात आली. या सात शहरांमध्ये 150 हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. गेल्या दोन दिवसांत 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शेकडो उड्डाणे तासनतास विलंबाने येत आहेत आणि निघत आहेत. गुरुवारी दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा दिसून आल्या, अनेक जण तासनतास त्यांच्या विमानांची वाट पाहत होते.

दिल्ली-मुंबई मार्गावरील भाडे पाच पट

इंडिगोच्या वारंवार होणाऱ्या विलंब आणि रद्दीकरणाचा थेट परिणाम हवाई तिकिटांच्या किमतींवर होताना दिसत आहे. दिल्ली – मुंबई मार्गावर सामान्यत 4-5 हजार तिकीट असून आता या किमतीचे तिकीट आता 21-25 हजारपर्यंत पोहोचले आहे.

निवडून दिलं म्हणजे सगळे…, तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंनी फडणवीस सरकारला सुनावलं

तर दुसरीकडे पुढील 48 तासांत सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी काम करत असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मान्य करतो की गेल्या दोन दिवसांत इंडिगो नेटवर्क ऑपरेशन्सवर गंभीर परिणाम झाला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एअरलाइनने तांत्रिक बिघाड, खराब हवामान, वाढलेली गर्दी आणि डीजीसीए एफडीटीएल नियमांमुळे या व्यत्ययाचे कारण दिले आहे.

Exit mobile version