Download App

1000 नोटाच्या पुन्हा मार्केटमध्ये येणार का? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

Monsoon Session 2023 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी 2000 च्या नोटाबंदीवरुन केंद्र सरकारला धारेवर धरले. भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात 2000 हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण ही मुदत आणखी वाढवणार का, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. सरकारने जनतेला संभ्रमात ठेऊ नये, असे अवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख वाढवली जाणार नाही, म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत जनतेने 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्यात. काळा पैसा संपवण्यासाठी सरकार इतर मोठ्या चलनी नोटा बंद करण्याचा विचार करत आहे का? त्यावर पंकज चौधरीनी अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय

सरकारकडे इतर मूल्यांच्या नोटांचा पुरवठा वाढवण्याचा किंवा 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा काही प्रस्ताव आहे का? असा सवाल करण्यात आला होता. यावर अर्थ राज्यमंत्री म्हणाले की RBI च्या म्हणण्यानुसार, 2000 ची नोट काढून घेणे ही चलन व्यवस्थापन होते. भविष्यातील धोका टाळण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेत कोणतेही टाळण्यासाठी नियोजित होती. याशिवाय, ₹ 2000 च्या नोटा बदलण्याच्या/ काढण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशभरात इतर मूल्यांच्या नोटांचा बँकेत पुरेशा आहेत.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 76 टक्के नोटा एकतर बँकांमध्ये जमा झाल्या आहेत किंवा बदलल्या गेल्या आहेत. चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा 19 मे रोजी घोषणेच्या दिवशी 3.56 लाख कोटी रुपयांवरून 30 जून रोजी 84,000 कोटी रुपयांवर आल्या आहेत.

Tags

follow us