हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय

हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान कनेक्शन असल्याचा संशय

Karnataka High Court : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबई गँगने पाठवलेल्या मेसेजमध्ये 50 लाख रुपये तात्काळ पाकिस्तानच्या बँकेत जमा करणे हाच त्यांचा जीव वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी के मुरलीधर यांच्या तक्रारीवरून बेंगळुरूच्या सायबर क्राइम पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मुरलीधर यांनी सांगितले की, 12 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता त्यांच्या फोनच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. उच्च न्यायालयाचे सहा न्यायाधीश आपले लक्ष्य असल्याचे संदेश पाठवणाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानच्या अलायड बँक लिमिटेडमध्ये 50 लाख जमा न केल्यास न्यायाधीशांची हत्या केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, न्यायमूर्ती एचटी नरेंद्र प्रसाद, न्यायमूर्ती अशोक जी, न्यायमूर्ती एचपी संदेश, न्यायमूर्ती के नटराजन, न्यायमूर्ती बी वीरप्पा या न्यायमूर्तींना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मात्र, धमकी देणाऱ्या व्यक्तीने केवळ याच न्यायमूर्तींनाच का लक्ष्य केले आहे, हे स्पष्ट केलेले नाही. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, जर पैसे पाकिस्तानच्या बँकेत पोहोचले नाहीत, तर तो सहा न्यायाधीशांना टार्गेट करून संपवू शकतो.

‘वडिलांचे आशिर्वाद, जनतेची साथ अन् तुमची ताकद’, ठाकरेंच्या घणाघाती मुलाखतीचा टीझर…

व्हॉट्सअॅप मेसेज पाठवणाऱ्याने स्वत:ला दुबई गँगचा सदस्य असल्याचे सांगितले आहे. त्याने मुरलीधर यांना वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज पाठवले आहेत. हे भारतीय आमचे टारगेट आहेत, असे संदेशात लिहिले होते. पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. धमकी देणारा कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

एका वृत्तानुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की, मेसेज पाठवणाऱ्याने या सहा न्यायाधीशांनाच का लक्ष्य केले हे स्पष्ट झाले नाही. तर कर्नाटक उच्च न्यायालयात इतर अनेक न्यायमूर्ती आहेत. सध्या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नेमके ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube