NCPI ला मोठा धक्का 20 पैकी 17 भाजपात जाणार? ‘या’ दिवशी होणार घोषणा

NCPI MP  :  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर  तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी पक्षाची साथ सोडत नॅशनालिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया

NCPI MP 

NCPI MP 

NCPI MP  :  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर  तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी पक्षाची साथ सोडत नॅशनालिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केल्याने देशातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले होते मात्र आता पुन्हा एकदा टीएमसीची साथ सोडणारे 20 बंडखोर खासदार चर्चेत आले आहे.  खासदार सायनी घोष यांच्यासह 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा टीएमसीचे नेते आणि खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया  यांनी केला आहे. 20 पैकी 17 खासदार ऑक्टोबरमधील दुर्गापूजेपूर्वी किंवा नंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

या 17  खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये (BJP) सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. सामूहिकरीत्या पक्ष बदलल्यास ते पक्षांतरबंदी कायद्याच्या (anti-defection law) कक्षेत येणार नाहीत असं माध्यमांशी बोलताना खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया (Jagadish Chandra Barma Basunia) म्हणाले.

पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीमध्ये बंड झाला होता. 14 जून रोजी, 20 नाराज तृणमूल खासदारांनी ‘नॅशनालिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली आणि सत्ताधारी ‘नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स’ला (NDA) पाठिंबा जाहीर केला. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी 20 पैकी 14 जणांनी एकत्रित भाजपमध्ये प्रवेश करणे गरजे आहे. जर 14 किंवा त्यापेक्षा जास्त खासदारांनी एकत्र भाजपमध्ये प्रवेश केला तर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही.

मुंबईत आधीच गर्दी अन्…., जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया-

तीन मुस्लिम खासदारांचा भाजपमध्ये सामील होण्यास नकारतर दुसरीकडे बसुनिया म्हणाले की, या 20 जणांच्या गटातील अल्पसंख्याक समाजाचे तीन खासदार अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होणार नाहीत कारण त्यांच्या संबंधित मतदारसंघांमधील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती अशा निर्णयासाठी अनुकूल नाही. खासदार अबू ताहिर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे बाहेरून NDA ला पाठिंबा देतील.

Exit mobile version