Download App

Video : पुरामुळे नागरिकांचे हाल! संतप्त महिलेने आमदाराच्या थेट कानशिलातच लगावली…

New Delhi : देशात मान्सून दाखल झाल्यानंतर उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीसह हरयाणात नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीसह यमुना नदीच्या पाणी पातळीने उच्चांक गाठला आहे. पुरामुळे नदीतून पाणी वाहण्याची ही पातळी आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. त्यामुळे दिल्लीसह हरयाणातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत.

राज्यात पूरजन्य परिस्थिती असल्याने ज्या त्या मतदारसंघातील आमदारांकडून परिस्थितीची पाहणी तसेच आढावा घेतला जात आहे. लोकप्रतिनिधींकडून जनतेला दिलासा देण्याचं काम सुरु आहे. अशातच एका संतप्त महिलेने आमदाराच्या कानशिलात लगावल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ज्या आमदाराच्या कानशिलात लगावली ते आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. महिलेने कानशिला लगावल्याची घटना हरयाणा राज्यात घडल्याचं सांगितलं जात आहे.

Faf Du Plessis Birthday: क्रिकेट विश्वाचा ‘राजा’ ज्याला क्रिकेट बोर्ड सक्तीने निवृत्त करतंय

हरयाणामधील जननायक जनता पार्टीचे आमदार ईश्वर सिंह घुला आपल्या मतदारसंघातील नागरिकांची विचापूस करण्यासाठी गेले होते. हरयाणातील घाग्गर भागात नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरु आहेत. नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इथल्या एका ज्येष्ठ महिलेने आमदार भेटीसाठी आले असतानाच तुम्ही कशासाठी आला आहात? असा सवाल उपस्थित करीत, थेट कानशिलातच लगावली आहे. याच भागात पुरामुळे एक बांध फुटला होता. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा संदर्भ देत रूपाली चाकणकरांनी घेतला गोगावलेंचा समाचार

व्हिडिओमध्ये काही लोकांना आमदाराला घेरा घातल्याचं दिसून येत आहे. पूरस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी आमदार ईश्वर सिंह घुला मतदारसंघात आले होते. व्हिडिओमध्ये सुरुवातीला आमदाराशी नागरिक संवाद साधत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर संतप्त होत एका महिलेने आमदारारच्या कानशिलात लगावली आहे.

दरम्यान, या महिलेने कानशिलात लगावल्यानंतर सदरील महिलेची कृती आपण विसरुन गेलो असून या महिलेविरोधात मी कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचं आमदार घुला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Tags

follow us