छत्रपती संभाजी महाराजांचा संदर्भ देत रूपाली चाकणकरांनी घेतला गोगावलेंचा समाचार

  • Written By: Published:
छत्रपती संभाजी महाराजांचा संदर्भ देत रूपाली चाकणकरांनी घेतला गोगावलेंचा समाचार

Rupali Chakankar On Bharat Gogavle : शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्या संदर्भात बोलताना महिलांचा अवमान होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर शिंदे गटातील काही आमदारांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये गोगावले यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्रिपदासोबत आपल्याला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणारच, असे गोगावले ठणकावून सांगत होते. परंतु आता अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाले आणि आता त्या रायगडच्या पालकमंत्री देखील होणार असल्याचे बोलले जाते. (Rupali Chakankar took the news of Gogavle referring to Chhatrapati Sambhaji Maharaj)

प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मात्र गोगावलेचा तोल सुटल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी रायगडच्या मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गोगावले म्हणाले, पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का?, आम्ही त्यांच्यापेक्षा (अदिती तटकरे) चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा तरी फरक येतो ना. असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

गोगावले यांच्या या वक्तव्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा संदर्भ देत चांगलाच समाचार घेतला. चाकणकर म्हणाल्या…आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

भरत गोगावले, आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते.

WhatsApp Image 2023 07 13 At 11.05.53 AM

 

परंतु आता रुपाली चाकणकर यांनी गोगावलेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून सोशल मीडियावर चांगल्याच ट्रॉल होताना दिसत आहेत. चाकणकरांना लोक म्हणतात तुम्ही निषेध व्यक्त करण्यापेक्षा गोगावलेवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच काही लोक म्हणतात आता कशी कारवाई करणार त्या. त्या तर आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या आहेत.

WhatsApp Image 2023 07 13 At 11.06.31 AM

WhatsApp Image 2023 07 13 At 11.06.31 AM

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube