Download App

Womens Day 2025 : महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या खास 6 योजना, कसा घ्याल लाभ?

हिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. द

  • Written By: Last Updated:

Government Scheme For Women: आज आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Womens Day) आहे. महिलांचे हक्क, समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हा दिन साजरा केला जातो. खरंतर महिलांनी अनेक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिध्द केलं आहे. मात्र, दुसरीकडे, ग्रामीण भागातील महिलांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारकडून अनेक योजन राबविल्या जात आहेत. दरम्यान, याच योजनांविषयी जाणून घेऊ.

लाडक्या बहि‍णींना सरकारने किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालातून मोठी माहिती समोर 

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
ही योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना हे भारतातील महिलांच्या उन्नतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे समाजातील मुलींचे हक्क तर बळकट होतातच पण, त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पायाही रोवला जातो. या योजनेचा उद्देश स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवणे आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणं हा आहे. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांना ५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता एक हजार रुपयांचा आहे, जो गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत नोंदणीच्या वेळी दिला जातो. प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर २००० रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो. तर बाळाच्या जन्मानंतर पहिली लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २००० रुपयांचा तिसरा हप्ता दिला जातो. ही रक्कम थेट महिलेच्या बँक खात्यात पाठवली जाते.

अमेरिकेत पाकिस्तानींना नो एन्ट्री? पाकिस्तानातही अफगाणी लोकांना अल्टीमेटम; काय घडलं? 

उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना स्वच्छ ऊर्जा पुरवणे तसचे धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून महिलांचे संरक्षण करणे हा आहे.

सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही भारत सरकारने सुरू केलेली दीर्घकालीन बचत योजना आहे. ज्याचा उद्देश मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत देणे आहे. या योजनेनुसार 8.2 टक्के वार्षिक व्याज दिले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत या योजनेची सुरुवात केली.
-या योजनेसाठी १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आई-वडिल किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.
– एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.
– खातेधारक प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १,५०,००० रुपये गुंतवू शकतात.
– खाते उघडल्यापासून १४ वर्षांपर्यंत या डिपॉझिट करू शकता. पण मॅच्युरिटीसाठी मुलीचे वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे.

महिला बचत सन्मान प्रमाणपत्र
महिला सम्मान बचत पत्र केंद्र सरकारनं महिलांसाठी सुरु केलेली अल्प बचत योजना आहे. ही योजना २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना कमी गुंतवणुकीवर जास्त व्याज दिले जाते. ही २ वर्षांची योजना आहे. ज्याअंतर्गत ७.५ टक्के वार्षिक व्याज दिले जाते आणि जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. याअंतर्गत देशातील कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते.

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना
महाराष्ट्रातही महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. दरम्यान, निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले असून या सरकारने महिलांना २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us