लाडक्या बहिणींना सरकारने किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालातून मोठी माहिती समोर

Mazi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. यासाठी राज्य सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेसाठी किती पैसे खर्च केले आहेत याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. या योजनेंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर यांना देण्यात आली होती. त्यांच्याकडून महिलांचे अर्ज भरण्यात आले. यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही लवकरच मिळणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सोमवारी (दि. 10) राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याआधी शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यात राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे याची माहिती दिली. तसेच कोणत्या योजनांवर किती निधी खर्च केला जात आहे याचीही माहिती देण्यात आली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे.
या योजनेंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांची आकडेवारी दिलेली नाही. आता मार्च महिना सुरू झाला आहे. तेव्हा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितच दिले जातात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरडोई उत्पन्नात मुंबई श्रीमंत, मराठवाडा पिछाडीवर
विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, दरडोई उत्पन्नाच्या (Per capita income) बाबतीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील (Marathwada) सर्वाधिक जिल्हे हे खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न १,८८,८९२ रुपये आहे. राज्यात ३६ जिल्हे असले तरी, पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धऱण्यात आला. तर ठाणे, पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्रित दरडोई उत्पन्न दाखवले आहे.
Priyadarshini Indalkar : निळ्या कॉटन साडीत प्रियदर्शिनी कडक अन् मादक अंदाज…