XPoSat Mission : एकीकडे नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. तर दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चे शास्त्रज्ञ त्यांच्या आगामी मिशनसाठी प्रार्थना करत होते. कारण वर्षांच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने एक्स-रे पोलेरिमीटर सॅटेलाईट (एक्सपोसॅट) (XPoSat Mission) या यानाचं प्रक्षेपण केलं आहे.
नवीन वर्षात ज्युनियर एनटीआरची प्रेक्षकांना मोठी भेट; ‘या’ दिवशी मिळणार ‘देवरा’ची पहिली झलक
श्रीहरी कोटायेथून हे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. यावेळी इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी टीमला संबोधित केलं. ते म्हणाले की, PSLV-C58 XPoSat च्या प्रक्षेपणासह नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. पुढील काळ आपल्यासाठी रोमांचक असेल. PSLV-C58 ने XPoSat 6 डिग्रीमध्ये जे टार्गेट होते त्याच ऑर्बिटमध्ये सेट केले आहे.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याला सहा महिन्यांची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप
तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, हे मिशन अनोखं असेल. कारण एक्स-रे पोलेरिमीटर सॅटेलाईटमध्ये अद्वितीय वैज्ञानिक क्षमता आहे. यातून आम्ही शंभर असे शास्त्रज्ञ तयार करण्यात करणार आहोत. जे जगाला ब्लॅक होलबाबत माहिती देतील.
Nana Patole : जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मतभेद? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
या मिशनसाठी रमण रिसर्च इन्स्टिट्यूटने सॅटॅलाईटचा प्राथमिक पेलोड बनवला होता. तर दुसरा पेलोड हा युआर राव सॅटॅलाइट सेंटर यांच्या ऍस्ट्रॉनॉमी ग्रुपने बनवला. त्यामुळे या मिशनसाठी वेगवेगळ्या संस्थांनी इस्रोसोबत भागीदारी केली आहे. तसेच येणाऱ्या काळात इस्रोच्या बकेट लिस्टमध्ये 12 मिशन आहेत.
तर एक्स-रे पोलेरी मीटर सॅटॅलाईट. या मिशनमधून इस्रो वेगवेगळ्या ऍस्ट्रॉनॉमिकल सोर्सेसबद्दल अभ्यास करणार आहे. ज्यामध्ये ब्लॅक होल, न्यूट्रॉन स्टार्स, एक्टिव गॅलेक्टिक न्यूक्लिआय, पल्सर विंड नेबुला यातून येणारे रेडिएशन या गोष्टींचा अभ्यास करणार आहे.