ISRO Metrological Satellite : चंद्र-सुर्यानंतर इस्त्रोची नवी मोहिम; फेब्रुवारीमध्ये अवकाशात नवा उपग्रह झेपावणार

ISRO Metrological Satellite : चंद्र-सुर्यानंतर इस्त्रोची नवी मोहिम; फेब्रुवारीमध्ये अवकाशात नवा उपग्रह झेपावणार

ISRO Metrological Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Metrological Satellite ) म्हणजेच इस्त्रोने चंद्र-सूर्यावर यशस्वी यान पाठवल्यानंतर आता इस्त्रो अवकाशामध्ये नवा उपग्रह (Metrological Satellite) पाठवणार आहे. हा हवामान शास्त्रीय उपग्रह INSAT-3DS GSLV F14 प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे पाठवण्यात आला आहे.

Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर; राणेंचं वादग्रस्त वक्तव्य

या अगोदर या उपग्रहाचे कॅप्चर केलेले यु. आर राव सॅटॅलाइट सेंटर बंगळुरू येथे उपग्रह असेंब्ली एकत्रितरण आणि चाचणी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालय सहवापर करता अनुदानित प्रकल्प आहे. जो इस्रोच्या I-2K बस प्लॅटफॉर्म वरती तब्बल 275 किलो लिफ्ट ऑफ वस्तुमानासह एकत्रित केला जातो आहे.

Rahat Fateh Ali Khan कडून नोकराला मारहाण? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर नोकरासह स्पष्टीकरण

तसेच फेब्रुवारीच्या मध्यात या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा उद्देश असा आहे की, सध्या असलेल्या INSAT-3D आणि 3DR उपग्रहांना सेवांची सातत्य प्रदान करणे आणि इन्सॅट प्रणालीच्या क्षमतांमध्ये लक्षणे वाढ करणे. त्यामुळे आता चंद्र सूर्य नंतर इस्रोची ही मोहीम लवकरच पूर्ण होणार आहे.

अखेर ‘गगनयाना’चे चाचणी उड्डाण यशस्वी

या दरम्यानच इस्त्रोने आणखी एका धाडसी मोहिमेला सुरूवात केलेली आहे. ती म्हणजे गगनयानाची पहिली चाचण यशस्वी करण्यात आली. या मोहिमेचा अर्थ असा की आता इस्त्रो मानवरहित मोहिमा आणि इतर चाचण्या करण्यास सक्षम असेल. याआधी उड्डाणासाठी फक्त पाच सेकंद बाकी असताना उड्डाण होल्ड करण्यात आले होते. यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या मोहिमेत तीन सदस्यांची टीम तीन दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या 400 किलोमीटर वरच्या कक्षेत पाठवली जाणार आहे. हे क्रू मॉडेल समुद्रात सुरक्षितपणे उतरवण्यात येईल. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube