Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर; राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि भूमिकांमुळे चर्चेत असतात. यावेळी देखील त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केलं आहे. पंढरपूरमधील माळशिरस या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Rahat Fateh Ali Khan कडून नोकराला मारहाण? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर नोकरासह स्पष्टीकरण
पोलीस आपलं काहीही वाकड करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. आपण कार्यक्रम करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. असं म्हणत नितेश राणे यांनी हिंदू कार्यकर्त्यांना एक प्रकारे चिथावणी दिली आहे. त्यामुळे आता सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
Horoscope Today: आज ‘या’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, यापुढे माळशिरसमधून एकच फोन आला पाहिजे की, नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतो. कारण पोलीस आपलं काहीही वाकड करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. आम्ही हिंदू सोबत उभा राहण्यासाठी आलोय कुणाच्या वाकड्यात फिरण्यासाठी नाही.