Download App

“मी ‘त्यांना’ सोडणार नाही” : एल्विश यादवचा मनेका गांधीना इशारा, माध्यमांवरही तोंडसुख

नवी दिल्ली : यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याने त्याच्या प्रतिमेला धक्का पोहचविल्याचा आरोप करत भाजप (BJP) खासदार मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नशेसाठी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी मनेका गांधी यांच्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने हा इशारा दिला आहे. याशिवाय याबाबत लवकर एक व्हिडीओ शेअर करणार असून त्यातून सत्य समोर येईल, असाही विश्वास त्याने व्यक्त केला.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका व्लॉग पोस्टमध्ये एल्विश यादव म्हणाला की, “मनेका गांधींनी मला सापाच्या विषाच्या पुरवठादारांचे प्रमुख म्हटले आहे. यावरुन मी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मी त्यांना सोडणार नाही. आता मी या सर्व गोष्टींबाबत सक्रिय झालो आहे. आधी मला वाटायचे की माझा वेळ वाया घालवू नये, पण आता माझ्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. (YouTuber Elvis Yadav has threatened to file a defamation case against BJP MP Maneka Gandhi)

तब्बल 80 हजार कोटी पाण्यात! संपूर्ण धरणच नव्याने बांधण्याची केंद्रीय समितीची राज्याला सूचना

‘पोलिसांनी तपास सुरू केल्यावर व्हिडिओ बनवेन’

एल्विश यादव म्हणाला, या प्रकरणात जेव्हा पोलिस तपास सुरू करतील, तेव्हा मी एक मुख्य व्हिडिओ देखील शेअर करेन. मी तुम्हाला सर्व काही दाखवीन. लवकरच एक प्रेस स्टेटमेंट देखील जारी केले जाईल. या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नसल्याचे मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे.

मेनका गांधींवर निशाणा साधत एल्विश म्हणाला की, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी गुन्ह्याची प्रत पाहिली. त्यात मेनका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेने हा खटला दाखल केल्याचे लिहिले होते. त्या म्हणत होत्या की मी माझ्या गळ्यात साप घालून फिरतो. पण ते सर्व गाण्याच्या शूटिंगसाठी होते आणि दुसरे काही नाही.

‘मी घराण्याचे नाव खराब करणार नाही’ :

एल्विश पुढे म्हणाला की, “या सर्व बेकायदेशीर कामांमध्ये अडकून मी माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाव खराब करणार नाही. या प्रकरणात माझा एक टक्काही सहभाग असेल तर मी आत्मसमर्पण करेन, मग यात शिक्षा 10 वर्षे असो वा 100 वर्षे. .” “प्रत्येकाला माहित आहे की माझा दर्जा इतका कमी झाला नाही की मी अशा प्रकारची गोष्ट करू शकेन.”

दोन महिन्यांत 650 वेबसाईट्सवर अभ्यास अन् अंबानींना धमकी : पोलिसांनी आठवड्यात केलं गजाआड

एल्विश यादव याचा मीडियावरही निशाणा :

यादरम्यान एल्विश यादवने मीडियालाही सोडले नाही. तो म्हणाला, मीडिया टीआरपीसाठी कोणाचेही नाव आणि प्रतिमा खराब करू शकते. आज मला जाणवले की सोशल मीडिया आणि विशेषतः आपली भारतीय मीडिया काहीही करू शकते. खोट्या बातम्या पसरवून तुम्ही एखाद्याला नवीन उंचीवर नेऊ शकता आणि एखाद्याला खालीही आणू शकता आणि त्यानंतर तुम्ही माफीही मागणार नाही.

Tags

follow us