Download App

तुमचे पालक, भाऊ अन् बहिणीला तुमची लाज वाटेल; सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारलं

रणवीर अलाहाबादियाने केलेल्या टीकेला न्यायालयाने 'विकृत' म्हटलं आहे. अलाहाबादियाच्या टीकेला सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत

  • Written By: Last Updated:

YouTuber Ranveer Allahabadia Reprimanded by Court : सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चांगलंच फटकारलं. (Ranveer ) न्यायालयाने रणवीरला अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र, त्याला चांगलेच खडेबोलही सुनावले आहेत. तसंच, त्याला चौकशीत सामील होण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित प्रकरणावर पुढील कोणताही एफआयआर नोंदवला जाणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

वकिलांना बंदी

न्यायालयाने अलाहाबादिया त्याच्या याचिकेवर नोटीस बजावली असून, त्याला अटकेपासून दिलासा देताना कडक अटी घालून दिल्या आहेत. या अटींनुसार, अलाहाबादिया यांनी तपासात पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. तसंच, पोलीस ठाण्यात त्यांच्यासोबत वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी राहणार नाही. रणवीरचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कोर्टाने पत्नी म्हटलच नाही, करूणा शर्मांना पोटगीचा विषय नाही; मुंडेंच्या वकिलांचे स्पष्टीकरण ​

रणवीर अलाहाबादियाने केलेल्या टीकेला न्यायालयाने ‘विकृत’ म्हटलं आहे. अलाहाबादियाच्या टीकेला सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत फेटाळलं आहे. रणवीर सारखे लोक आई-वडिलांचा अपमान करत आहेत. या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का. अशी वक्तव्यं विकृत मानसिकतेचं लक्षण आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

हे सर्व कॉर्पोरेट उपक्रमांसाठी आहे आणि तुम्ही कोणासाठी काही करत नाही आहात, असा टोला लगावत न्यायालयाने अलाहाबादियाला लगावला आहे. ‘तुमचे पालक, भाई आणि बहिणींना तुमची लाज वाटेल. तुमची वक्तव्य ऐकून लाजेनं मान खाली जाते, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

follow us