‘…तर कारवाई होणार’, CM फडणवीसांचा रणवीर अलाहाबादियाला थेट इशारा

  • Written By: Published:
‘…तर कारवाई होणार’, CM फडणवीसांचा रणवीर अलाहाबादियाला थेट इशारा

Devendra Fadnavis On Ranveer Allahabadia : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला (Ranveer Allahabadia) सध्या प्रचंड ट्रोल होतोय. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटमध्ये त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झालाय. रणवीवर अनेकांनी टीकेची झोड उठली आहे. रणवीरला बॉयकॉट करण्याचीही मागणी होत आहे. दरम्यान, रणवीरच्या वक्त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत नाराजी व्यक्त करत केली आहे.

रणवीर अलाहाबादिया नेमकं काय म्हणाला?
‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या नवीनतम भागात रणवीर अलाबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला. रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की, तुला त्यांच्यासोबत सामील होऊन ते कायमचे थांबवायला आवडेल? असा प्रश्न विचारला. यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरनं सांगितलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला इशारा…

रणवीर अलाहाबादिया याच्या या आक्षेपार्ह विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून हा शो पाहिला नाही. पण, खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं. हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असतात. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम बनवले गेले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे, असं काही घडत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

रणवीरची महिला आयोगाकडे तक्रार
दरम्यान, रणवीर अलाहाबादियाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. असे लोक पैसे आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकतात, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. आता वकील आशिष राय यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि महिला आयोगाकडे तक्रार करत रणवीरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube