माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये रुग्ण बनून आले अन्…, रणवीर इलाहाबादियालाची धक्कादायक पोस्ट व्हायरल

  • Written By: Published:
माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये रुग्ण बनून आले अन्…, रणवीर इलाहाबादियालाची धक्कादायक पोस्ट व्हायरल

Ranveer Allahabadia : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया (Ranveer Allahabadia) याने समय रैनाच्या (Samay Raina) ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या यूट्यूब शोवर पालकांवर केलेल्या एका कमेंटवरुन चांगलाच वादात सापडला आहे. या प्रकरणात समय रैनासह त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने देखील समन्स पाठवले आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी समन्स पाठवले होते मात्र रणवीर इलाहाबादिया चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झालेला नाही. तर आता त्याने एक्सवर एक धक्कादायक पोस्ट केली आहे. मी पुर्णपणे तपासात सहकार्य करत आहे मात्र मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. काही लोक माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये रुग्ण म्हणून येत आहे आणि जीवे मारण्याची धमकी देत आहे. असं त्यानी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी आणि माझी टीम पोलिसांना सहकार्य करत आहोत. मी प्रक्रियेचे पालन करेन आणि एजन्सींसाठी उपलब्ध राहीन . पालकांबद्दलच्या माझ्या टिप्पण्या खूपच असंवेदनशील आणि अपमानजनक होत्या. चांगले काम करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मी तुमची मनापासून माफी मागतो. असं त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच मी लोकांना मला जीवे मारण्याची धमकी देताना पाहत आहे, ते मला मारायचे म्हणत आहेत. लोक रुग्णांच्या वेशात माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये घुसले. मला खूप भीती वाटते आणि मला काय करावे हे कळत नाही. मी पळून जात नाहीये. मला भारतातील पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.असं देखील त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रकरण काय?

गेल्या काहीदिवसांपासून इंडियाज गॉट लेटेंट शो च्या एका भागावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोच्या एका भागात रणवीर इलाहाबादिया याने पालकांबद्दल वादग्रस्त कमेंट केला होता. त्यानंतर रणवीर इलाहाबादिया विरोधात आसाम, महाराष्ट्रसह अनेक राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व भाग यूट्यूबवरुन डिलीट करण्याचा निर्णय समय रैनाने घेतला आहे. या प्रकरणात मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी अलाहाबादिया आणि रैनासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोठी बातमी! महाकुंभातील सेक्टर 19 मधील अनेक मंडपांमध्ये आग, भाविकांमध्ये घबराट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube