Download App

YS Sharmila : CM जगनमोहन यांना धक्का! बहिण शर्मिलांची काँग्रेसमध्ये एन्ट्री; पक्षही केला विलीन

YS Sharmila joins Congress : आंध्र प्रदेशच्या राजकारणात आज मोठी घटना घडली. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला (YS Sharmila) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभुमीवर शर्मिला यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाने पक्षाला राज्यात ताकद मिळाली आहे. शर्मिल यांनी त्यांचा वायएआर तेलंगणा हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, केसी वेणुगोपाल उपस्थित होते.

शर्मिला यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राज्यात काँग्रेसची राजकीय ताकद वाढली आहे. शर्मिला यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात नवी इनिंग सुरू केली असली तरी त्यांच्यासाठी पुढील वाटचाल सोपी नाही. कारण, त्यांचे बंधू मु्ख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड निर्माण केली आहे, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

वायएस शर्मिलांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला; भावाच्या पराभवासाठी बहिणच करणार मदत

काही वर्षांपूर्वी शर्मिला यांनी वेगळा राजकीय पक्षाची स्थापना करत तेलंगणात राजकारणाला सुरुवात केली होती. जगनमोहन यांनी जशी पदयात्रा काढली होती तशीच पदयात्रा शर्मिला यांनी तेलंगणातही काढली होती. पण तरीही नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले नव्हते. काँग्रेसला मदत करण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा तेव्हा झाली होती. त्यानंतर शर्मिला लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

तसं पाहिलं तर दक्षिणेतील राज्यात काँग्रेसची स्थिती ठिकठाक आहे. कर्नाटक आणि तेलंगणात सत्ता मिळाली आहे. केरळात प्रमुख विरोधी पक्ष आहे तर तामिळनाडूत आघाडी करून उपस्थिती दाखवली आहे. फक्त आंध्र प्रदेशात मात्र पक्षाची स्थिती वाईट आहे. येथे पक्षाचा एकही आमदार आणि खासदार नाही. अशा परिस्थितीत शर्मिला यांच्या येण्याचा काँग्रेसला कितपत फायदा होईल हे आताच सांगता येणे कठीण आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील राजकारण पाहता काँग्रेस शर्मिला यांना मोठं पद देईल अशी चर्चा सुरू आहे.  कदाचित प्रदेशाध्यक्ष पदही दिलं जाऊ शकतं.

आंध्र प्रदेशात रेड्डी बहीण-भाऊ वेगळे का झाले? काँग्रेसला मिळणार संजीवनी

दरम्यान, YS शर्मिला यांनी तेलंगणामध्ये स्वतःची संघटना स्थापन केल्यानंतर जुलै 2021 मध्ये भाऊ-बहीण राजकीयदृष्ट्या वेगळे झाले होते. वायएसआरसीपी आणि वायएसआरटीपी या दोन्ही पक्षांची स्थापना वायएसआरचा वारसा पुढे नेण्याच्या आणि “राजन्ना राज्यम” (वायएसआरचे राज्य) परत आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली.

follow us