Download App

Telangana Elections : वायएस शर्मिलांचा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, ‘या’ पक्षाला दिला पाठिंबा

  • Written By: Last Updated:

YS Sharmila : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची (Telangana Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतरची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने बाजी मारली होती. दिवंगत नेते वायएस आर राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला (YS Sharmila) या देखील तेलंगणा निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या होत्या. पण, आता वायएस शर्मिला यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने CM भूपेश बघेलांना दिले 508 कोटी; ईडीचा खळबळजनक दावा 

वायएस शर्मिला यांनी तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस पाठिंबा देईल, असे शर्मिला यांनी सांगितले.

शर्मिला यांनी म्हटलं की, वायएसआर पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत केसीआर यांचा पराभव करायचा असेल तर मतांचे विभाजन टाळावे लागेल. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार नाही. त्याऐवजी काँग्रेसला पाठिंबा देऊ.

केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएसची भ्रष्ट राजवट संपवण्यासाठी त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे,असं शर्मिला यांनी सांगितलं. आम्ही विधानसभा निवडणूक लढवल्याचा काँग्रेसच्या मतांवर परिणाम होत असल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. राज्य आणि तेथील नागरिकांच्या हितासाठी मी तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शर्मिला म्हणाल्या.

वायएस शर्मिला यांनी सप्टेंबरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे शर्मिला म्हणाल्या होत्या.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस यांच्यात 119 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत चुरशीची लढत आहे. दरम्यान शर्मिला यांनी तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकचं नाही तर त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळं आता तेलंगणा निवडणूकीत केसीआर यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते.

Tags

follow us