Yumnam Khemchand : भाजप नेते युमनम खेमचंद हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असणार आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्रीपद गेल्या एका वर्षापासून रिक्त होते. मणिपूरमध्ये गेल्या एका वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू होती.
मणिपूरमध्ये (Manipur) जातीय हिंसाचार सुरू असताना एन. बिरेन सिंग (N. Biren Singh) यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तर आता नवी दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत खेमचंद सिंग (Yumnam Khemchand) यांची मणिपूर भाजप (BJP) विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर, मणिपूरचे पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.
#WATCH | BJP leader Yumnam Khemchand Singh elected as the legislature party leader, in the Manipur Legislative Party meeting in Delhi. pic.twitter.com/TV4AHACZpW
— ANI (@ANI) February 3, 2026
युमनम खेमचंद हे दोन वेळा आमदार राहिले आहेत, त्यांनी 2017 मध्ये आणि 2022 मध्ये सलग दोनदा सिंगजामेई विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे.
भाजपने रविवारी आमदारांना आणि युतीमधील नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) च्या आमदारांना दिल्लीला बोलावले होते. त्यानंतर असा अंदाज वर्तवण्यात येत होता की, पक्ष राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करू शकते. तर आता भाजपकडून मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून युमनम खेमचंद सिंह यांचा नाव जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचे आभार
मणिपूरचे भाजप आमदार ठोकचोम राधेश्याम सिंह म्हणाले, “आपल्याकडे एक निवडून आलेले सरकार, एक लोकप्रिय सरकार येणार आहे ही चांगली गोष्ट आहे. हे बऱ्याच काळापासून रखडले आहे. म्हणून, या पावलाबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो… प्रत्येक समस्येवर तोडगा असतो. मला विश्वास आहे की केंद्र सरकार आणि युमनम खेमचंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या नवीन सरकारच्या मार्गदर्शनाने आपल्याला तोडगा निघेल.”
अजित पवारांच्या बायोपिकमध्ये अभिनेता कोण? स्वतः अजितदादांनी दिलं होतं उत्तर
