Zomato Charges Increased : आपल्या देशात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने जेवण मागवण्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकजण घरीबसुन झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) सारख्या कंपन्यांच्या मदतीने जेवणाची ऑर्डर देत आहे. मात्र आता झोमॅटो आणि स्विगीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आता ऑनलाईन फूड ऑर्डर करणं महागणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, झोमॅटो आणि स्विगीने आपले डिलिव्हरी चार्चेस तब्बल 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. जर तुम्ही देखील झोमॅटो आणि स्विगीवरून फूड ऑर्डर (Food Order) करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येक ऑर्डरसाठीचे चार्जेस 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही कंपन्या प्रत्येक ऑर्डरसाठी आता सहा रुपये चार्ज घेणार आहे. यापूर्वी प्रत्येक ऑर्डरसाठी या कंपन्या पाच रुपये चार्ज घेत होते.
माहितीनुसार, वाढीव चार्जेस बंगळुरू, दिल्लीमध्ये सध्या लागून करण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसात इतर शहरात देखील वाढीव चार्जेस लागू होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. नफा वाढवण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या कंपन्या जाहिरातीच्या माध्यमातून तसेच रेस्टॉरंट्सकडून मिळणाऱ्या कमिशनमधून देखील नफा कमवत आहे.
मोठी बातमी! पूजा खेडकरांना ट्रेनिंग होल्ड करण्याचे आदेश
तर आता या कंपन्यांनी डिलिव्हरी चार्चेस वाढवून जास्त नफा कमवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षांपासून स्विगी आणि झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी घेणं चालू केलं आहे. ही फी यापूर्वी दोन रुपये होती मात्र आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहे.
SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा , प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा