तुमची प्रायव्हसी धोक्यात?; झोमॅटोच्या एका निर्णयामुळे का फुटलंय वादाला तोंड…

Zomato Data Sharing Policy : भारतीय बाजारात आपली कमी वेळेत एक वेगळी ओळख निर्माण करणारी झोमॅटो कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Zomato Data Sharing Policy

Zomato Data Sharing Policy

Zomato Data Sharing Policy : भारतीय बाजारात आपली कमी वेळेत एक वेगळी ओळख निर्माण करणारी झोमॅटो कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे देशात नवीन वादाला तोंड फुटले आहे. झोमॅटोने रेस्टॉरंट्ससोबत ग्राहकांचे नंबर शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाचा सध्या सोशल मीडीयावर विरोध होताना दिसत आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या प्रायव्हसीला धक्का बसणार असल्याचं बोलले जात आहे. जर रेस्टॉरंट्ससोबत (Zomato) ग्राहकांचा डेटा शेअर झाला तर वेगवेगळ्या ऑफर्ससाठी ग्राहकांना मेसेज किंवा काॅल येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोशल मीडियावर कंपनीच्या या निर्णयाचा सध्या मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

माहितीनुसार, संपूर्ण देशात झोमॅटो तब्बल 5 हजारपेक्षा जास्त रेस्टॉरंट्सशी (Zomato Data Sharing Policy) जोडले गेले आहे आणि आता या रेस्टॉरंट्ससोबत कंपनी ग्राहकांचा डेटा शेअर करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे स्विगीदेखील (Swiggy) अश्या प्रकारचा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

झोमॅटो काय निर्णय घेणार ?

सध्या झोमॅटोची पॉलिसी नो डेटा शेअर आहे. म्हणजेच जर तुम्ही झोमॅटोवरुन काही ऑर्डर केले तर तुमचा नंबर किंवा इतर कोणतीही माहिती रेस्टॉरंट्सकडे जात नाही मात्र आता कंपनीने मार्केटींग आणि प्रमोशनल मेसेजसाठी ग्राहकांना त्यांचा फोन नंबर रेस्टॉरंट्ससोबत शेअर करण्याची परवानगी मागणारे पॉप-अप पाठवण्यास सुरुवात केली आहे.

या पॉप- अप मेसेजमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांनी एकदा माहिती शेअर करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर ती मागे घेऊ शकत नाही. पॉप-अपमध्ये असं लिहिले आहे की, मी रेस्टॉरंट्स प्रमोशनलसाठी माझ्याशी संपर्क साधण्याची परवानगी देतो. तर दुसरीकडे रेस्टॉरंट्कडून अशी तक्रार करण्यात येत आहे की डेटा मस्किंगमुळे ते ग्राहकांशी थेट संपर्क साधू शकत नाही ज्यामुळे ग्राहकांची आवडनिवड समजण्यास, मार्केटिंग करण्यास अडचण येत आहे.

राजकीय विरोध

तर या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, झोमॅटो हे पारदर्शकता वाढवण्यासाठीचे पाऊल मानू शकते, परंतु ग्राहकांसाठी ते डेटा गोपनीयतेचे उल्लंघन आहे. जर झोमॅटो आणि इतर अ‍ॅप्सने अशी भूमिका घेतली तर आयटीवरील स्थायी समितीचा सदस्य म्हणून मी डेटा गोपनीयता कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची विनंती करेन.

CJI B.R. Gavai : निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीशांचा देशाला महत्वाचा संदेश, म्हणाले, मी बौद्ध पण…

मिलिंद देवरा (Milind Deora) शिवसेना खासदार म्हणाले, झोमॅटो आणि स्विगी ग्राहकांचे मोबाइल नंबर रेस्टॉरंट्ससोबत शेअर करण्याची योजना आखत आहेत. यामुळे गोपनीयतेचे धोके निर्माण होतात आणि सुधारित सेवेच्या नावाखाली स्पॅम वाढण्याचा धोका निर्माण होतो. ग्राहकांच्या डेटाचा आदर केला जाईल याची खात्री करण्यासाठी आम्हाला नवीन डीपीडीपी नियमांनुसार स्पष्ट आणि अस्पष्ट ऑप्ट-इन मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे.

Exit mobile version