८६ तोळे सोने, १५० हिरे, ३.५ किलो चांदीवर डल्ला; झोमॅटोचे कपडे घालून घरफोडी करणारी टोळी जेरबंद

  • Written By: Published:
८६ तोळे सोने, १५० हिरे, ३.५ किलो चांदीवर डल्ला; झोमॅटोचे कपडे घालून घरफोडी करणारी टोळी जेरबंद

Pune News : डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी (Pune Police) जेरबंद केलं. त्यांच्याकडून ८६ तोळे सोने, १५० हिरे आणि ३.५ किलो चांदीसह कोट्यवधी रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांची ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.

Video : मोदींकडून महायुतीच्या आमदारांचा ‘क्लास’; पण, डावलेल्या मुनगंटीवारांनी वेगळचं सांगितलं 

या चोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ३,००० सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी आरोपींकडून एक दुचाकी, ०२ पिस्तूल, ०५ जिवंत काडतुसे आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्र असा १ कोटी रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हर्सेटाइल अभिनेत्री ते पॅराग्लायडिंग पायलट! सईची बातच न्यारी… 

पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल ३००० सीसीटिव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली. काठेवाडे याची कसून चौकशी केली असता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःची ओळख लपविण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचं स्मार्तना पाटील यांनी सांगितलं.

या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख कारागृहात झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते. याच प्रकरणात सोने विक्री करणारा व्यावसायिक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आली आहे.

गणेश काठेवाडेवर ५५ पेक्षा अधिक गुन्हे
गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे

या संपूर्ण गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरफोडी करण्यापूर्वी झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झालं. तो घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. चोरीचे दागिने यातून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवले तर काही पैसे शेअर मार्केटमध्ये (इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये) गुंतविल्याचे निष्पन्न झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube