Video : मोदींकडून महायुतीच्या आमदारांचा ‘क्लास’; पण, डावलेल्या मुनगंटीवारांनी वेगळचं सांगितलं
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Mahayuti Meeting With PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्धनौकामुळे भारताची ताकद वाढणार आहे. या कार्यक्रमांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) सर्व आमदारांची बैठक संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत महायुतीच्या आमदारांना कोणता कानमंत्र दिला. याविषयी मात्र महायुतीतील आमदारांकडून चुप्पी साधली आहे.
मोबाईल नेण्यास बंदी, बैठकीवर महायुती आमदारांचे मौन
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच महायुतीतील बहुतेक सर्वच आमदारांना पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केलं. मात्र त्यापूर्वी विधान भवन येथून आमदरांना डॉकयार्ड येथील कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी दहा बसचा वापर करण्यात आला. आमदारांना मोबाईल नेण्यास बंदी करण्यात अली होती. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केल्यानंतर महायुतीतील आमदारांना बैठकीसंदर्भात विचारण्यात आलं. मात्र, यावरती प्रत्येक आमदारांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमका कोणता कानमंत्र आणि कशाप्रकारे कान टोचले? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार? BCCI चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
विकास कामांवर भर द्या; हिरामण खोस्कर
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोस्कर यांनी नरेंद्र मोदी यांच्या बैठकीविषयी बोलतांना सांगितलं की, मनात कोणत्याही प्रकारचा विरोधकांना बाबत आकस ठेवून काम करू नका. निवडणूक आटोपल्या आहे. आता मतदारसंघातील विकास कामाकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यक्रम वरती भर द्या, या बैठकीत कोणत्या प्रकारे स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि राजकीय चर्चा झाल्या नसल्याची माहिती त्यांनी दिली.
कोणतेही खडे बोल सुनावले नाही; दीपक केसरकर शिवसेना आमदार
बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आमदारांना केलेल्या मार्गदर्शनाबाबत माहिती देताना शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले, की राजकीय जीवनात तुम्ही जनतेचे प्रश्न कसे सोडवावे? याविषयी मार्गदर्शन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांनी आपले स्वतःचे अनुभव यावेळी शेअर केले. आमदारांना कोणत्याही प्रकारचे खडे बोल सुनावले नसल्याचं केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी विरोधकांविषयी काही बोलले नाही. उलट प्रबोधन केल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
‘फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवलं का?’, कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना सवाल…
पारिवारीक सवांद होता; राधाकृष्ण विखे पाटील मंत्री भाजपा
विश्वनेता आणि आमचे नेते पंतप्रधान मोदी यांनी अतिशय मनमोकळेपणाने अनौपचारिक संवाद साधला. आम्ही अतिशय आनंदी आहोत ,अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. हा पारिवारीक सवांद होता. कोणतीही राजकीय चर्चा नाही. यापेक्षा जास्त आमचे मुख्यमंत्री फडणवीस बोलतील, असे त्यांनी म्हटलंय.