VIDEO : …तर विषयाचा फोकस दुसरीकडे जातो; राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीवर वार करत धस पुन्हा बरसले
MLA Suresh Dhas Statment On NCP : वाल्मिक कराडची (Walmik Karad) अटक बेकायदेशीर असल्याचा दावा कराडच्या वकिलांनी केलाय. यावर आता आमदार सुरेश धस यांनी सवाल उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी विचारलंय की, परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविण्यपूर्ण योजना. परळीचा हाही एक पॅटर्न. महाराष्ट्राने यापुढे घालून घ्यावा. यापुढे कोणात्याही आरोपीला त्याला लागलेल्या कलमाखाली ताब्यात घेतलं की, शहरं बंद करायची. दुकाने बंद करायची. मोठ्यानं ओरडायचं आणि शहरं बंद ठेवायची. असा एक नवीन पॅटर्न कालपासून या ठिकाणी सुरू झालाय, असं आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले आहेत.
मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय
अशा प्रकारच्या दबावाला कोण विचारतं, असा सवाल देखील सुरेश धस यांनी उपस्थित केलाय. मकर संक्रांतीचा बाजार बंद केला. अशाने व्यापारी स्वत:चं नुकसान होतंय. जातीय वाद नाहीये, हा गुंडावाद वाद आहे. हे चार-पाच टक्के लोक आहेत, त्यांचा गुंडावाद आहे. कृपया जातीवाद शब्द वापरू नका, असं देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय. तर आरोपींसाठी शहर बंद ठेवायची, हा नवा पॅटर्न सुरू झाला असल्याची टीका देखील सुरेश धस यांनी केलीय.
प्रेमभंग, बेरोजगारी की नैराश्य? कुंभमेळ्यातील IIT पासआऊट अभय सिंहची कहाणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. परळीत कर्तव्यदक्ष एसपी दिले आहेत. त्यांनी तिथे काय-काय कारवाई केली, हे आज विचारतो. धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या मातोश्रींना भेटलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे. वाल्मिक कराडच्या आईविरोधात मला काहीही बोलायचं नाही. महिला-भगिणीच्या बाबतीत बोलल्यास फोकस दुसरीकडे जातो. त्यामुळं माझी विनंती आहे की, तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांना सांगा की, राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा.
अजून बरेच फोकस आहेत. उज्वल निकम यांची नियुक्ती आहे. त्यानंतर केस व्यवस्थित चालतेय का, हे पाहणं देखील गरजेचं आहे. आतापर्यंत आका सापडला. आकाच्या पुढे काय कडी सापडते का? आगंतुक मुळं आणखी किती सापडत आहेत? एकच सोटमुळ ताब्यात आलंय. आगंतुक मुळं अजून बाकी असल्याचं देखील सुरेश धस यांनी सांगितलं. माझ्या मतदारसंघाच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. दुसऱ्या कोणत्याच बाबतीत त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.