बांग्लादेशस्थित हिंदुंना संरक्षण द्या, प्रियंका चतुर्वेदींनी मोदींना धाडलं पत्र…

बांग्लादेशस्थित हिंदुंना संरक्षण द्या, प्रियंका चतुर्वेदींनी मोदींना धाडलं पत्र…

Priyanka Chaturvedi News : बांग्लादेशात हिंदु जनसमुदायावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रच धाडलंय. बांग्लादेशस्थित हिंदु समाजाच्या लोकांवर अन्याय, अत्याचार केला जात असून भारताने हा मुद्दा उचलून हिंदुंना संरक्षण देण्याची मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींकडे केलीयं.

बांग्लादेशात चिन्मय कृष्ण दास यांच्यानंतर आणखी दोन हिंदू धर्मगुरूंना अटक करण्यात आलीय. तर त्याआधी हिंदू समुदायाचे नेते चिन्मय ब्रम्हचारी यांना ढाकाच्या शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमातळावर अटक करण्यात आलीयं. या विरोधात बंगालसह इतर भागांत आंदोलने सुरु आहेत. बांग्लादेशात होत असलेले हिंदुवरील हल्ल्यांचा निषेध करीत असून केंद्र सरकारने त्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी जोर धरु लागलीयं. अशातच आता प्रियंका चतुर्वेदी यांनी याविरोधात आवाज उठवलायं.

मी DyCM पदाच्या शर्यतीत नाही, शिंदेंनंतर आता मुलगा श्रीकांत शिंदेंची मोठी घोषणा

मी केंद्र सरकारसोबत – ममता बॅनर्जी
जेव्हा दुसऱ्या देशांसंदर्भातील गोष्ट समोर येईल तेव्हा आम्ही केंद्र सरकारसोबत ठामपणे उभे राहणार आहोत. जर कोणत्याही धर्माच्या लोकांवर अत्याचार होत असेल तर त्याची आम्ही निंदा करीत असून बांग्लादेशात कोणत्या धर्माच्या लोकांवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याचं समर्थन करीत नाही. बांग्लादेशात हिंदू नेता चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांना अटक करण्यात आलीयं. यासंदर्भात मी इस्कॉनच्या प्रमुखांशी चर्चा केलीयं. हे प्रकरण दुसऱ्या देशातील असल्याने केंद्र सरकारने त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube