MP Medha Kulkarni aggressive against a BJP leader : मेधा कुलकर्णी भाजपच्या (Medha Kulkarni)पुण्यातील नेत्या. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरुड मतदारसंघातून त्यांचे तिकीट कापले आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. चंद्रकांत पाटील (Chandkarkant Patil) हे येथून दोनदा येथून निवडून आले आणि मंत्री झाले. तिकीट कापल्याची सल मेधा कुलकर्णी यांनी वेळीवेळी जाहीरपणे बोलवून दाखविली. शेवटी पक्षाने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर घेत, त्यांची नाराजी दूर केली. पण भाजपच्या नेत्याशी संबंधित यशवंत सहकारी बँकेतील 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक पवित्रा का घेतलाय ? त्या थेट गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना का भेटल्या ? यातून पुण्यातील राजकारण पुन्हा तापणार का ? हे सर्व या व्हिडिओतून जाणून घेऊया…
राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, नितेश राणेंची टीका
भाजप नेत्याने बँक खाल्ली ?
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत नागरी सहकारी बँकेमध्ये 140 कोटींचा कर्ज घोटाळा झाला आहे. या कर्जांपैकी तब्बल 127 कोटींचे कर्ज बनावट संस्थांच्या नावावर आहे. भाजपचे नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात हा घोटाळा झालाय. याप्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यासह त्यांचे बंधू भाजपचे पदाधिकारी शार्दूल चरेगावकर यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल आहे.
Letsupp Exclusive : राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण…
चरेगावकरांविरुद्ध थेट अमित शाहांना भेटल्या
या घोटाळ्याप्रकरणातील ठेवीदारांना भेटण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी या थेट कराडला गेल्या होत्या. त्यांनी ठेवीदारांची बैठक घेत गाऱ्हाणे एकूण घेतले. ठेवीदार आणि काही कर्जदारांच्या तक्रारींची पोलिसांकडून दखल घेतली जात नाही. या बँकेवर प्रशासक नियुक्त करून बँकेच्या कारभाराची चौकशी व्हावी, संचालकांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केलीय. भाजप नेत्याविरुद्ध मेधा कुलकर्णी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय.
कोणाच्या नादी लागताय ? मेधा कुलकर्णी यांना धमकी
शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल सुरेश चारेगावकर यांनी मला धमकीचा फोन केला, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला. कोणाच्या नादी लागताय? या आधी आम्ही त्यांचे तिकीट कापले. यापुढे देखील त्यांचे तोंड कसे बंद करायचे हे आम्हाला माहित आहे, अशी धमकी शार्दूल चारेगावकर यांनी दिल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केलाय. या प्रकरणात अधिकाऱ्यांवर सरकारमधील लोकांकडून दबाव असल्याचा दावा देखील खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलाय.
मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपातून अनेक अँगलची लिंक लागत आहे. 2014-2019 च्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, त्याचकाळात शेखर चरेगावकर यांना महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या पदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. शेखर चरेगावकर हे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्य सहकारमंत्री आहेत. परंतु त्यांची भेट न घेता मेधा कुलकर्णी या थेट अमित शाह यांना भेटल्या आहेत. मोठ्या घोटाळ्यात ठेवीदारांना न्याय मिळून देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांची भूमिका चांगलीच आहे. पण चरेगावकरांचा बंदोबस्त करून तिकीट कापल्याचे उट्टे काढण्याची संधी या प्रकरणामुळे मेधा कुलकर्णी यांना मिळाली असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.