त्यावेळी माझा सोडा ‘त्यांचा’ जन्म झाला होता का?, शनिवारवाडा प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पुन्हा आक्रमक

आज रुपाली ठोंबरे यांनी पुण्यातील शनिवारवाड्याच्या परिसरात येऊन आंदोलन केलं. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • Written By: Published:
News Photo (18)

पुण्यात सध्या शनिवारवाना निषय गाजला आहे. शनिवारवाडा येथे नमाज पठण केल्याचा कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी काही हिंदुत्त्ववादी संघटनेला सोबत घेऊन शनिवारवाडा परिसरात आंदोलन केलं. सोबतच ज्या ठिकाणी महिलांनी कथितपणे नमाज पठण केलं होतं, त्या भागात गोमुत्र शिंपडून तिथे शेणाने सारवण्यात आलं होतं. (Pune) आता मेधा कुलकर्णी यांच्या याच कृत्याचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विरोध केला आहे. अजितदादांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

आज रुपाली ठोंबरे यांनी पुण्यातील शनिवारवाड्याच्या परिसरात येऊन आंदोलन केलं. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच नमाज पठण केले म्हणजे शनिवारवाडा संबंधित व्यक्तीच्या नावाचा होत नाही, असंही मत यावेळी रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केले. मेधा कुलकर्णी यांनी हा विषय वेगळ्या वळणावर नेला आहे. शनिवारवाडा हा मराठा साम्रज्यातील पेशव्यांचे मुख्यालय होतं,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या. तसंच, मेधा कुलकर्णी काल जी मजार दाखवत होत्या ती 1936 साली असल्याची त्यांची नोंद आहे. माझा सोडा पण तेव्हा मेधा कुलकर्णी यांचातरी तेव्हा जन्म झाला होता का? ज्या हिंदू संघटना तिथे आंदोलन करत होत्या, त्यांच्या कार्यकर्त्यांचा तरी जन्म झाला होता का? असा रोखठोक सवालही यावेळी मेधा कुलकर्णी यांनी केला.

खासदार मेधा कुलकर्णींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा — अजित पवार गटाची मागणी

यामध्ये कुठेतरी हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही रुपाली ठोंबरे म्हणाल्या. नमाज पठण केले म्हणून त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संरक्षणाचे कारण दाखवत हा गुन्हा दाखल करण्यात आला, असे सांगत नमाज पठण केल्याने शनिवारवाड्याला कोणता धोका निर्माण झाला का? हे आम्हाला पोलिसांनी सांगावे, अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली.

कुठल्याही धर्मातील माणसाने शनिवारवाड्यात प्रार्थना केली म्हणजे संबंधित व्यक्तीच्या नावावर शनिवारवाडा होईल, असे होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठलाही जाती-धर्म मानत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान ठेवण्यासाठी संविधान तयार केले. सरकार हे कायद्यावर, संविधानावर चालते. एखाद्या खासदाराला एवढी अकल्ल नसेल तर अवघड आहे. अशा बायकांना खासदारकी का देतात हे समजत नाही, असा हल्लाबोल रुपाली ठोंबरे यांनी केला.

तसेच, मी मेधा कुलकर्णी नाही. मी उठसूट जीभ उचलली आणि बोलले असे मी करणार नाही. मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले. मेधा कुलकर्णी यांना हिरव्या रंगाचा एवढा राग का आहे, ते मला समजत नाही. हिंदू समाजात हिरवा हा रंग सौभाग्याचं लेणं आहे. सौभाग्य म्हणून आम्ही हिरवा रंग परिधान करतो, असे म्हणत मेधा कुलकर्णी यांच्याकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रुपाली ठोंबरे यांनी केला.

follow us