Download App

मोठी बातमी : आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंना जबर धक्का

विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी (Ravindra Waikar) केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप करून विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Shiv Sena ) त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून, ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, रविंद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

(Case Registered Against Shiv Sena (UBT) Leader Vilas Potnis & His Security Guard)

 

मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावरून विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. कलम 188 आणि 128 (2) लोकप्रतिनिधित्व अधिनियम सह 54 निवडणूक नियमांचे नियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दारआदित्य ठाकरेंचे रवींद्र वायकरांवर टीकास्त्र

मंगेश पांडिलकर हा फोन वापरत असल्याचं वनराई पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी ओटीपी जनरेट करण्यासाठी हा मोबाईल फोन वापरला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गौरव हा निवडणूक आयोगात एनकोर (पोल पोर्टल) ऑपरेटर होता. वनराई पोलिसांनी मंगेश पांडिलकर यांच्यासह निवडणूक आयोगाचं मतदान कर्मचारी दिनेश गौरव यांना CrPC 41A अंतर्गत नोटीस बजावली आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला. यापूर्वी या जागेवर कीर्तीकर यांना एका मताने विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र, फेरमतमोजणीत वायकर 48 मतांनी विजयी झाले. रवींद्र वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 मते मिळाली आहेत. तर उद्धव गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली आहेत.

follow us