एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार…; आदित्य ठाकरेंचे रवींद्र वायकरांवर टीकास्त्र

एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिममच्या उमेदवाराने लोकशाहीसोबत विश्वासघात केला. - आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

 

Aditya Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला. मुंबई उत्तर-पश्चिम मध्य लोकसभेच्या मतमोजणीवेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी वायकर यांच्या मेहुण्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) रवींद्र वायकरांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Father’s Day 2024: अमृताने शेअर केल्या वडिलांसोबतच्या गोड आठवणी, फादर्स डे निमित्त केला फोटो पोस्ट 

आदित्य ठाकरेंनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिममच्या उमेदवाराने लोकशाहीसोबत विश्वासघात केला. निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत नाही, यातून आयोगाचा सुध्दा सहभाग असल्याचं दिसून येते. चंदीगड प्रकरणात झालेल्या प्रकारात त्यांची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून ही दृश्ये दिली जात नाहीत. भाजप आणि मिंधे गटाला लोकशाही संपवायाची आहे आणि संविधानही बदलायचे आहे, असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी टीका केली.

आफ्रिकाच नाही टीम इंडियानेही केलाय ‘हा’ कारनामा; ‘त्या’ दोन सामन्यांत काय घडलं होतं? 

दरम्यान, निकालानंतर चार दिवसांनी अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी पत्र लिहिले होते. कीर्तिकरांनी मतमोजणी केंद्रात गोंधळ झाल्याचे सांगत 4 जून रोजी दुपारी 4 ते 8 या वेळेत मतदान केंद्रावर काय घडले याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. यावर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर या मुद्द्यावर कोर्टात धाव घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला. यानंतर कीर्तिकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला होता. याप्रकरणी वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचे ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. तपासात पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाईल फोन वापरत असल्यचाची धक्कादायक माहिती समोर आली आहे, अशी माहिती मिड-डे या वृत्तपत्रात देण्यात आली.

follow us