काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आता याच प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका
या प्रकरणावर देशातील नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे, त्याचबरोबर सामान्य नागरिकांची देखील प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने तातडीने त्यांचे निलंबन करणे योग्य नव्हते. त्यांनी अपिल केले होते, त्यासाठी थांबायला पाहिजे होते. ही पुर्णपणे राजकीय सडूबुद्धीने कारवाई केली आहे. ज्यांच्या मनात भिती असते व ज्यांना आवाज ऐकायची सवय नसते तेच लोक अशी कारवाई करत असतात, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध केला आहे.
या कारवाईला मी फक्त एका खासदारापुरते किंवा राहुल गांधींपुरते मर्यादित ठेवणार नाही. यामधून असे स्पष्ट दिसते आहे की देशात लोकशाही राहिलेली नाही. देशामध्ये सत्य बोलणाऱ्यांना काहीही वाव राहिलेला नाही, अशा शब्दात ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सत्यासाठी लढताना माफी का मागायची आणि जर माफी मागितली नाही तर निलंबन करु हे लोकशाहीत योग्य नाही, असे ठाकरे म्हणाले आहेत.
Jitendra Awhad : दुस-यासाठी खड्डा खणतो तो…; आव्हाडांनी केंद्र सरकारला फटकारले
दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा राहुल गांधी यांना देण्यात आलेली असून ते अपील करणार आहेत. मात्र असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत.