Download App

CM शिंदे राजस्थान प्रचारात; आदित्य ठाकरेंनी घेरलं, म्हणाले, जिथून पगार मिळतोयं..,

Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिथून पगार मिळतो, तिथलं काम करावंच लागणार असल्याची टीका ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. पाच राज्यांपैकी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) भाजपचा प्रचार करताना दिसून आले आहेत. यावेळी भाजपला मतदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे. यावरुन आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना शिंदेंना घेरलं आहे. आदित्य ठाकरे यांनी चिपळून दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला.

Sujay Vikhe : ‘कुणाच्या नाड्या कशा आवळायच्या मला ठाऊक’; साखरपेरणीनंतर विखेंचाही ‘कडू’ डोस

आदित्य ठाकरे म्हणाले, खोके सरकारकडून पैशांची उधळपट्टी कुठे आणि कशी करायची हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. मुंबईमध्ये कंत्राटदारांनी कंत्राट सेटींग करु दिलेले आहेत. हे सरकार बिल्डर कंत्राटांचं आहे. बाप चोरला, पक्ष चोरला हा किती निर्लज्जपणाचा कळस आहे. किती दिखावा, किती मास लावून फिरणार आहात, कहीही केलं तरीही गद्दारीचा शिक्का तुम्ही पुसू शकत नाहीत. एकनाथ शिंदेंना जिथून पगार मिळतो त्याचं काम तर करावंच लागणार असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

दरम्यान, मागील वर्षीपासून शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होत. आपल्या समर्थकांसह भाजपसोबत हातमिळवणी करीत राज्यात सत्तास्थापन केली.

Ind Vs Aus : भारताला 209 धावांचं आव्हान; जॉश इंग्लिश, स्मिथची बॅट तळपली

तेव्हापासून उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. याआधी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे रडले होते, असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “अरे ते जाऊदे. आदित्य ठाकरे अजून लहान आहेत”, असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं होतं.

टीमला दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनविलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई; क्रिकेटपासून लांब रहावं लागणार!

दरम्यान, आदित्य ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान, शिंदे गटातील नेत्यांसह एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत असतात. अशातच आता मुख्यमंत्री भाजपचा पगार घेत असल्याचं अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यावरुन ठाकरे-शिंदेंमध्ये जोरदार वाकयुद्ध होणार असल्याची शक्याता आहे.

Tags

follow us