‘अॅनिमल’ची टीम पोहोचली बांगला साहिब गुरुद्वारात, रणबीर कपूर-बॉबी देओलने घेतले आशीर्वाद

Animal Movie : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'अॅनिमल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि त्याचा ट्रेलर आज 23 नोव्हेंबर रोजी लाँच झाला.

आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अॅनिमलच्या संपूर्ण टीमने दिल्लीतील बांगला साहिब गुरुद्वारामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले.

अॅनिमल'च्या ट्रेलर लॉन्चवेळी संपूर्ण टीम दिल्लीत उपस्थित होती. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, रणबीर कपूर, बॉबी देओल, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा, निर्माता भूषण कुमार, प्रणय रेड्डी वंगा यांच्यासह अॅनिमलच्या संपूर्ण टीमने दिल्लीतील बांगला साहिब गुरुद्वारामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले आणि नमन केले.

यावेळी अभिनेता रणबीर कपूर पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसला. तर बॉबी देओलने फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि पँट घातली होती. दोन्ही कलाकार संपूर्ण टीमसह गुरुद्वारामध्ये हात जोडून आशीर्वाद घेताना दिसले.

या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. यामध्ये रणबीर कपूर एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो आपल्या कुटुंबासाठी आणि वडिलांसाठी काहीही करू शकतो. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
