अकोल्यात कृषी विभागाच्या कथित धाडीप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या कथित धाडीच्या पथकामध्ये सत्तारांचा पीए असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, तो माझा पीए नसल्याचा दावा सत्तारांनी केला मात्र, त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय दौऱ्यात त्याचं पीएचा उल्लेख असल्याचं स्पष्ट झालंय.त्यामुळे आता अब्दुल सत्तार अडणीत येणार असल्याचं बोललं जातंय.
अकोल्यात काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या कथित धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं स्वीय सहाय्यक आणि काही समर्थक असल्याचा आरोप कृषी व्यवसायिकांनी केला.
पथकातील काही लोकांनी पैसेही मागितल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला होता. त्यावर बोलताना सत्तार यांनी माझा स्वीय सहाय्यक दीपक गवळी नसून कुलकर्णी नावाचा स्वीय सहाय्यक असल्याचं विधान प्रसारमाध्यमांसमोर केलं होतं.
Ahmednagar : पोलीस बनले शेतमजूर; फिल्मी स्टाईल पाळत ठेवून आरोपीला केले जेरबंद
मात्र, त्यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान, आयोजित शासकीय दौऱ्यामध्ये स्वीय सहाय्यक म्हणून दीपक गवळीचा उल्लेख केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सत्तारांनी शब्द फिरवल्याने त्यांचा पाय खोलात जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता कृषीमंत्री सत्तार खरं बोलतात की त्यांच्या शासकीय दौऱ्याचं पत्र खरं बोलतंय? हा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणी विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
‘राहुल गांधी दहशतवादी लादेनसारखी दाढी ठेवतात….’,भाजप नेत्याच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
दीपक गवळी हे कृषी अधिकारी असून मागील काही दिवसांपासून ते कायमच अब्दुल सत्तार यांच्यासमवेत असल्याचे दिसून आले आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी सत्तारांनी दीपक गवळी माझा स्वीय सहाय्यक नसल्याचं म्हटलं त्यावेळी गवळी त्यांच्यामागे उभे असल्याचं दिसून आलं आहे.
लग्नापूर्वीचं प्रेग्नंट असलेल्या Ileana D’cruz ने मिस्ट्रीमॅनचा फोटो पोस्ट केला खरा, पण…
अंबादास दानवेंची मागणी :
कृषी विभागाकडून अशी कोणतीही धाड टाकण्यात येत नाही. ही धाड चुकीची आहे. कृषी विभागाच्या पूर्व परवानगीनंतरच संबंधिक कंपनी सील केली जाऊ शकते. धाडीसाठी ज्या त्या जिल्ह्यातील प्रशासनिक अधिकारी जात असतात.
त्यांना कारवाईमध्ये काही संशयास्पद वाटल्यास ते त्यांना तशी लेखी सूचना देतात. मात्र, सील करण्याचा अधिकार त्यांना नसतो. या धाड पथकात कृषीमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माजी जिल्हा परिषद कसा काय जातो? या प्रकरणी संबंधितांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.