लग्नापूर्वीचं प्रेग्नंट असलेल्या Ileana D’cruz ने मिस्ट्रीमॅनचा फोटो पोस्ट केला खरा, पण…

Untitled Design   2023 06 10T165137.198

Ileana D’cruz : टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana Dcruz) चाहत्यांना गोड बातमी दिली. लग्न न करताच इलियानाने प्रेग्नन्सी (Pregnancy ) जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र अद्याप तिने आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचं नाव जाहिर केलेलं नाही. त्यानंतर आता तिने थेट आपल्या या बॉयफ्रेंडचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे. ( Before Marriage Pregnant Ileana D’cruz post a photo of Mistry Man )

इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. तिच्या कामासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असते. तर आता तिच्या एका पोस्टने सर्व चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वळवले आहे. ती आई होणार असल्याचे तिने तिच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवरून जाहीर केले.

Rohit Pawar यांची ‘TDM’ सिनेमाची पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘अजूनही प्राईम टाईम शो…’

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी तिने आपलं बेबीमून इन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते त्यावेळी देखील तिने आपल्या मिस्ट्री मॅनचं नाव आणि फोटो दाखवला नव्हता. तर यावेळी तिने तिच्या पोस्टमध्ये एक अंधुक असा फोटो शेअर करत गरोदरपणाविषयीच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे यावेळी देखील तिच्या चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. की, इलियानाच्या होणाऱ्या बाळाचे वडिल कोण आहेत?

Gadar 2 Teaser: सनी देओलच्या ‘गदर 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, जबरदस्त डायलॉग पाहून चाहतेही म्हणाले…

काय आहे इलियानाची इन्स्टा पोस्ट?

प्रेगनंन्सी एक आशिर्वाद आहे. मला वाटलं नव्हतं हे भाग्या मला मिळेल. माझ्या आत वाढत असलेलं हे जीवन मी शब्दांत नाही सांगू शकत. माझ्यासाठी हा आनंदाचा धक्का आहे. मी त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे. मला जेव्हा हवं असतं तेव्हा तो मला मिठी मारतो. तर आता काहीही काठीण वाटत नाही. असं तिने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us