Gadar 2 Teaser: सनी देओलच्या ‘गदर 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, जबरदस्त डायलॉग पाहून चाहतेही म्हणाले…

Gadar 2 Teaser: सनी देओलच्या ‘गदर 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, जबरदस्त डायलॉग पाहून चाहतेही म्हणाले…

Gadar 2 Teaser: दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी पुन्हा एकदा मोठा पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु आता या सिनेमाच्या निर्मात्यांनी टीझर रिलिज केला आहे.

सिनेमाचा टीझर रिलीज झाला असला तरी कोणत्याही सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म वरती अपलोड करण्यात आलेला नाही. प्रेक्षकांना या सिनेमाचा टीझर पाहायचा असेल तर त्यांना चित्रपटगृहात जाऊनच बघावा लागणारच आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमाचे चाहते ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा चित्रपटगृहात पाहतील त्यांना ‘गदर २’ चा टीझर पाहिला मिळेल.

‘गदर २’ हा सिनेमा मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या गदर टू या सिनेमाबद्दलच्या अपडेट्स, दरम्यान चे फोटोज आणि व्हिडिओज सातत्याने व्हायरल होत होते. त्यामुळे प्रेक्षकांची टीझर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोचली होती. रिलीज केलेल्या टीझरमध्ये सनी देओलचा डायलॉग सध्या सोशल मीडियामध्ये ट्रेंड होतोय. या डायलॉग मध्ये एक महिला म्हणते की, ‘तो पाकिस्तानचा जावई आहे, त्याला नारळ द्या, टिळा लावा, नाहीतर तो हुंड्यासाठी लाहोरला घेऊन जाईल…!’

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

काही दिवसांनी या सिनेमचा टीझर युट्युब वरती प्रदर्शित केला जाणार आहे. ‘द कथा कंटिन्यूज: गदर 2’ या सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केला आहे आणि हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube