Meera Joshi: मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चक्काचूर; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “गमावलं ना…”

Meera Joshi: मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चक्काचूर; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “गमावलं ना…”

Meera Joshi: ‘अगंबाई अरेच्चा २’ फेम मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या (Meera Joshi) कारचा अपघात (Car accident) झाला आहे. मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर (Video share) करत अपघात झाल्याची माहिती दिली होती. तिच्या या व्हिडीओमध्ये कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे. भीषण अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे, पण मीरा सुखरुप बचावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)


मीराने ‘क्रॅश्ड अँड मिसिंग’ असे कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. तिने आपल्या कारचा सखी असा उल्लेख करत ती व्हिडीओमध्ये सांगितले आहे, “प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण. रात्र-दिवस, ऊन-वारा, पाऊस चढ उतार काही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. परंतु आज इतका भीषण अपघात होऊन देखील तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडा देखील येऊ दिला नाहीस. थँक्यू. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजार मैलांचा आपला प्रवास. गमावलं ना मी तुला. आता विश्रांती घे.

मीराच्या या पोस्टनुसार तिचा मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिच्या गाडीचे खूप नुकसान झाले आहे आणि ती बचावली आहे. अपघातामध्ये बचावलेल्या मीराने गाडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही पोस्ट लिहिली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स करून तिच्या प्रकृतीविषयी विचारत आहेत. तसेच तिला काळजी घेण्यास सांगत आहेत.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

नेमकं काय घडलं?

महामार्गांवर अपघात होण्याचं सत्र सुरुच आहे. मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला आहे. तिची कार मारुती सुझुकी दुभाजकावर धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातात तिच्या कारचा चक्काचूर झाला असून अभिनेत्री मात्र सुखरुप आहे. गाडीचं मोठं नुकसान झाल्याने तिने स्वत: सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

निर्जीव वस्तुंनाही आपण जीव लावतोच हे मीरा जोशीच्या पोस्टमधून लक्षात येईल. अभिनेत्रीने स्वत: अपघाताची माहिती देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने अपघातानंतर कारची झालेली अवस्था दाखवली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube